Active Voice - Affirmative Imperative Sentence


कर्तरी प्रयोग - होकारार्थी आज्ञार्थी वाक्यटीप १

जेव्हा इंग्रजी वाक्याची सुरूवात To च्या Verb ने केलेली असते, तेव्हा त्या वाक्याला Affirmative Sense (अॅफर्मेटीव सेन्स) चे Imperative Sentence (इम्परेटीव सेन्टेन्स) असे म्हणतात.

मराठीमध्ये Affirmative Sense चा अर्थ होकारार्थी किंवा सकारात्मक असा आहे आणि Imperative Sentence चा अर्थ आज्ञार्थी किंवा विनंतीवाचक वाक्य असा आहे.

टीप २

कधीकधी To च्या Verb ने सुरू झालेल्या Imperative Sentence च्या अगोदर एखादे Noun हे संबोधन म्हणून वापरलेले असते.

संबोधन म्हणून वापरलेल्या Noun ला इंग्रजी व्याकरणामध्ये Vocative (व्होकेटीव) असे म्हणतात.

टीप ३

संबोधन म्हणून वापरलेल्या Noun ला नेहमी comma (कॅामा) म्हणजे स्वल्पविराम केलेला असतो; कारण हे संबोधनाचे Noun हे त्या Imperative Sentence चा भाग नसते.

त्यामुळे, Imperative Sentence ओळखताना Vocative (संबोधन) विचारात न घेता त्याच्यानंतर वापरलेले To चे Verb लक्षात घ्यावे लागते.

टीप ४

कधीकधी या वाक्यातील To च्या Verb च्या अगोदर Do / Please / Now / Then / Now just अशा प्रकारचे एखादे Adverb वापरलेले असते.

हे Adverb सुद्धा या Imperative Sentence चा भाग नसल्यामुळे ते विचारात न घेता त्याच्यानंतर वापरलेले To चे Verb लक्षात घ्यावे लागते.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १

Imperative Sentence च्या अगोदर जर एखादे Vocative (संबोधन) किंवा Adverb वापरलेले असेल, तर पहिल्या स्थानी ते लिहावे

नियम २

दुसऱ्या स्थानी let लिहावे.

वाक्यामध्ये जेव्हा एखादे Vocative (संबोधन) किंवा Adverb वापरलेले नसते, तेव्हा Let चे पहिले अक्षर Capital लिहावे.

नियम ३

तिसऱ्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चे Object आहे त्याच स्वरूपात लिहावे.

नियम ४

चौथ्या स्थानी be लिहावे.

नियम ५

पाचव्या स्थानी To च्या Verb चे Past Participle लिहावे.

नियम ६

सहाव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.

For Example (उदाहरणार्थ)
 • Active
  Boy, polish my shoes nicely.
 • Passive
  Boy, let my shoes be polished nicely.
 • Active
  Write a few names off the list.
 • Passive
  Let a few names be written off the list.
 • Active
  Forgive the condemned most kindly.
 • Passive
  Let the condemned be forgiven most kindly.
 • Active
  Do bring her to me tomorrow.
 • Passive
  Do let her be brought to me tomorrow.
 • Active
  Please ask your questions.
 • Passive
  Please let your questions be asked.
 • Active
  Find out your own lapses.
 • Passive
  Let your own lapses be found out.
 • Active
  Now just take a good look at this monstrosity.
 • Passive
  Now just let a good look be taken at this monstrosity.

This article has been first posted on and last updated on by