Active Voice - Intransitive Imperative Sentence


कर्तरी प्रयोग - अकर्मक आज्ञार्थी वाक्यटीप १

जेव्हा इंग्रजी वाक्याची सुरूवात To च्या Verb ने केलेली असते, तेव्हा त्या वाक्याला Affirmative Sense (अॅफर्मेटीव सेन्स) चे Imperative Sentence (इम्परेटीव सेन्टेन्स) असे म्हणतात.

मराठीमध्ये Affirmative Sense चा अर्थ होकारार्थी किंवा सकारात्मक असा आहे आणि Imperative Sentence चा अर्थ आज्ञार्थी किंवा विनंतीवाचक वाक्य असा आहे.

टीप २

जेव्हा इंग्रजी वाक्याची सुरूवात Do not किंवा Don't यांपैकी शब्दांनी केलेली असते, तेव्हा त्या वाक्याला Negative Sense (निगेटिव सेन्स) चे Imperative Sentence असे म्हणतात.

मराठीमध्ये Negative Sense चा अर्थ नकारार्थी किंवा नकारात्मक असा आहे.

टीप ३

जेव्हा Imperative Sentence मध्ये वापरलेले To चे Verb हे Intransitive (अकर्मक) असते, तेव्हा त्या To च्या Verb ला जोडून कधीही Object (कर्म) वापरले जात नाही.

टीप ४

परंतु, Object नसूनही अशा Imperative Sentence चा Passive Voice (कर्मणी प्रयोग) करता येतो हे लक्षात ठेवावे.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १

Affirmative Sense (होकारार्थी / सकारात्मक)

Intransitive Verb (अकर्मक क्रियापद) असलेले Imperative Sentence जर Affirmative Sense असेल, तर Passive Voice करण्यासाठी प्रथम You are asked to हे शब्द लिहून घ्यावेत.

या शब्दांना जोडून दिलेले Imperative Sentence जसेच्या तसे लिहावे. मात्र, लिहिताना पहिले अक्षर Capital लिहू नये.

नियम २

Negative Sense (नकारार्थी / नकारात्मक)

Intransitive Verb (अकर्मक क्रियापद) असलेले Imperative Sentence जर Negative Sense असेल, तर Passive Voice करण्यासाठी प्रथम You are asked not to हे शब्द लिहून घ्यावेत.

या शब्दांना जोडून दिलेले Imperative Sentence वाक्यातील Don't / Do not हे शब्द काढून जसेच्या तसे लिहावे.

For Example (उदाहरणार्थ)
 • Active
  Sit down.
 • Passive
  You are asked to sit down.
 • Active
  Stand up.
 • Passive
  You are asked to stand up.
 • Active
  Stop
 • Passive
  You are asked to stop.
 • Active
  Keep to the left.
 • Passive
  You are asked to keep to the left.
 • Active
  Keep quiet.
 • Passive
  You are asked to keep quiet.
 • Active
  Don't get upset.
 • Passive
  You are asked not to get upset.
 • Active
  Do not be angry.
 • Passive
  You are asked not to be angry. upset.

This article has been first posted on and last updated on by