Let ची रचना असलेल्या वाक्याला सुद्धा Imperative Sentence असे म्हणतात.
या वाक्याची रचना पुढील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे असते.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १
पहिल्या स्थानी Let लिहावे.
नियम २
दुसऱ्या स्थानी वाक्यातील Object आहे त्याच स्वरूपात लिहावे.
नियम ३
तिसऱ्या स्थानी be लिहावे.
नियम ४
चौथ्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चे Past Participle लिहावे.
नियम ५
पाचव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.
नियम ६
सहाव्या स्थानी by हे Preposition लिहावे.
For Example (उदाहरणार्थ)
-
ActiveLet me write a letter to my father.
-
PassiveLet a letter be written to my father by me.
-
ActiveLet us plant some trees along the road.
-
PassiveLet some trees be planted along the road by us.
-
ActiveLet him help his poor friend.
-
PassiveLet his poor friend be helped by him.
-
ActiveLet them solve these puzzles.
-
PassiveLet these puzzles be solved by them.
-
ActiveLet the boy clean the backyard.
-
PassiveLet the backyard be cleaned by the boy.
-
ActiveLet the people choose their next king.
-
PassiveLet the new king be chosen by the people.