Active Voice - Sentence having Auxiliary Verb


कर्तरी प्रयोग - सहाय्यक क्रियापद असलेले वाक्य


टीप १

या प्रकारच्या Active Voice च्या वाक्यात Subject नंतर must / may / might / can / could / should / would यांपैकी एखादे Auxiliary Verb वापरलेले असते.

टीप २

Auxiliary Verb सोबत त्याला जोडून Present Tense चे Transitive (सकर्मक) असलेले To चे Verb वापरलेले असते.

टीप ३

तसेच, वाक्यातील To चे Verb हे Transitive (सकर्मक) असल्यामुळे त्याला जोडून Object वापरलेले असते.

वाक्याचा Passive Voice करण्यासाठी याच Object ची आवश्यकता असते.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १

पहिल्या स्थानी वाक्यातील Object लिहावे.

नियम २

Object म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Object म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Accusative Case चे Pronoun Nominative Case चे Pronoun
me I
us We
you You
him He
her She
it It
them They
नियम ३

दुसऱ्या स्थानी वाक्यातील Auxiliary Verb जसेच्या तसे लिहावे.

नियम ४

तिसऱ्या स्थानी be लिहावे.

नियम ५

चौथ्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चे Past Participle लिहावे.

नियम ६

पाचव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.

नियम ७

सहाव्या स्थानी by हे Preposition लिहावे.

नियम ८

सातव्या स्थानी वाक्याचा Subject लिहावा.

नियम ९

Subject म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Nominative Case चे Pronoun Accusative Case चे Pronoun
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
For Example (उदाहरणार्थ)
  • Active
    We must respect the elders.
  • Passive
    The elders must be respected by us.
  • Active
    They can cross the river in ten minutes.
  • Passive
    The river can be crossed in ten minutes by us.
  • Active
    He could push the stone aside.
  • Passive
    The stone could be pushed aside by him.
  • Active
    The students might complete the exercise tomorrow.
  • Passive
    The exercise might be completed tomorrow by the students.
  • Active
    Raghav should take their difficulties into account.
  • Passive
    Their difficulties should be taken into account by Raghav.

This article has been posted on and last updated on by