या प्रकारच्या Active Voice च्या वाक्यात Subject ला जोडून want / wants / wanted यांपैकी एखादे Main Verb वापरलेले असते आणि त्याला जोडून Infinitive वापरलेले असते.
अशा रचनेच्या वाक्याचा Passive Voice करण्यासाठी ज्या Object ची आवश्यकता असते, ते Object हे नेहमी वाक्यातील Infinitive ला जोडून वापरलेले असते.
अर्थात, हे Infinitive नेहमी Transitive (सकर्मक) असावे लागते.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
पहिल्या स्थानी वाक्यातील Subject आहे त्याच स्वरूपात लिहावा.
दुसऱ्या स्थानी वाक्यातील Infinitive चे Object आहे त्याच स्वरूपात लिहावे.
तिसऱ्या स्थानी to be लिहावे.
चौथ्या स्थानी वाक्यातील Infinitive च्या Verb चे तिसरे रूप म्हणजे Past Participle लिहावे.
पाचव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.
-
ActiveThe prince wanted to know the secret of their happiness.
-
PassiveThe prince wanted the secret of their happiness to be known.
-
ActiveThe teacher wanted them to put to her test.
-
PassiveThe teacher wanted them to be put to her test.
-
ActiveNow he wants to forget all the wars and victories.
-
PassiveNow he wants all the wars and victories to be forgotten.
-
ActiveMy parents want to give me a wristwatch as a birthday gift.
-
PassiveMy parents want me to be given a wristwatch as a birthday gift.