Passive Voice - Simple Future Tense


कर्मणी प्रयोग - साधा भविष्यकाळटीप १

ज्या वाक्यात will be / shall be यांपैकी एखादे To be चे Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत त्याला जोडून Past Participle वापरलेले असते, त्या वाक्याला Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे Simple Future Tense चे वाक्य असे म्हणतात.

टीप २

ही Passive Voice ची रचना असल्यामुळे अशा वाक्यामध्ये सामान्यतः by हे Preposition वापरलेले असते आणि त्याला जोडून एखादे Common Noun / Proper Noun / Accusative Case चे Pronoun वापरलेले असते.

टीप ३

by + Common Noun / Proper Noun / Accusative Case चे Pronoun याला Doer (डूअर) असे म्हणतात.

टीप ४

Passive Voice च्या रचनेमध्ये कधीकधी वाक्यात doer वापरलेला असतो आणि कधीकधी doer वापरलेला नसतो.

जेव्हा वाक्यामध्ये doer वापरलेला नसतो, त्यावेळी वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तो doer गृहीत धरावा लागतो.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १

प्रथम वाक्याचा doer लिहावा.

नियम २

doer म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, doer म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Accusative Case चे Pronoun Nominative Case चे Pronoun
me I
us We
you You
him He
her She
it It
them They
नियम ३

दुसऱ्या स्थानी will लिहावे आणि त्याला जोडून Past Participle चे Present Tense (पहिले रूप) लिहावे.

नियम ४

तिसऱ्या स्थानी Passive Voice च्या वाक्याचा Subject लिहावा.

नियम ५

Subject म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Nominative Case चे Pronoun Accusative Case चे Pronoun
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
नियम ६

चौथ्या स्थानी Passive Voice च्या वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.

मात्र, shall be / will be आणि by लिहू नयेत.

For Example (उदाहरणार्थ)
 • Passive
  Trees will be planted along both the sides of the road on August 15.
 • Active
  People will plant trees along both the sides of the road on August 15.
 • Passive
  A car wil be driven by a man under training.
 • Active
  A man under training will drive a car.
 • Passive
  All the fruits will be sold by the fruit vendor.
 • Active
  The fruit vendor will sell all the fruits.
 • Passive
  They will be helped generously by him.
 • Active
  He will help them generously.
 • Passive
  The project will be completed in the last week of August by Kedar.
 • Active
  Kedar will complete the project in the last week of August.

This article has been first posted on and last updated on by