Active Voice - Simple Present Tense


कर्तरी प्रयोग - साधा वर्तमानकाळटीप १

ज्या Active Voice (कर्तरी प्रयोग) च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice (कर्मणी प्रयोग) मध्ये करावयाचे असते, त्या वाक्याचे पुढील तीन घटक लक्षात घ्यावे लागतात.

Subject + To चे Verb + Object

टीप २

त्याचप्रमाणे, हे वाक्य कोणत्या Tense चे आहे, हेसुद्धा लक्षात घ्यावे लागते.

टीप ३

Active Voice च्या वाक्यातील To चे Verb जेव्हा Present Tense (पहिले रूप) चे असते, तेव्हा त्या वाक्याला Simple Present Tense चे वाक्य असे म्हणतात.

टीप ४

Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करण्यासाठी या वाक्यातील Object ची आवश्यकता असते.

Object म्हणून सामान्यतः एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते आणि ते To च्या Verb ला जोडून वापरलेले असते.

या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १

पहिल्या स्थानी वाक्यातील Object लिहावे.

नियम २

Object म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Object म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Accusative Case चे Pronoun Nominative Case चे Pronoun
me I
us We
you You
him He
her She
it It
them They
नियम ३

दुसऱ्या स्थानी पुढीलप्रमाणे am / is / are यांपैकी योग्य ते To be चे Verb लिहावे.

Object To be चे Verb
me am

him


her


it


Singular Number Noun

is

us


you


them


Plural Number Noun

are
नियम ४

तिसऱ्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चे Past Participle लिहावे.

नियम ५

चौथ्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.

नियम ६

पाचव्या स्थानी by हे Preposition लिहावे.

नियम ७

सहाव्या स्थानी वाक्याचा Subject लिहावा.

नियम ८

Subject म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Nominative Case चे Pronoun Accusative Case चे Pronoun
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
For Example (उदाहरणार्थ)
 • Active
  A mother gives a man life.
 • Passive
  A man is given life by a mother.
 • Active
  God protects us all from all the troubles.
 • Passive
  We are protected from all the troubles by God.
 • Active
  Electricity runs our local trains.
 • Passive
  Our local trains are run by electricity.
 • Active
  They watch television regularly.
 • Passive
  Television is watched regularly by them.
 • Active
  They play football on weekends.
 • Passive
  Football is played on weekends by them.

This article has been first posted on and last updated on by