ज्या वाक्यात am / is / are यांपैकी एखादे To be चे Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत त्याला जोडून Past Participle वापरलेले असते, त्या वाक्याला Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे Simple Present Tense चे वाक्य असे म्हणतात.
ही Passive Voice ची रचना असल्यामुळे अशा वाक्यामध्ये सामान्यतः by हे Preposition वापरलेले असते आणि त्याला जोडून एखादे Common Noun / Proper Noun / Accusative Case चे Pronoun वापरलेले असते.
by + Common Noun / Proper Noun / Accusative Case चे Pronoun याला Doer (डूअर) असे म्हणतात.
Passive Voice च्या रचनेमध्ये कधीकधी वाक्यात doer वापरलेला असतो आणि कधीकधी doer वापरलेला नसतो.
जेव्हा वाक्यामध्ये doer वापरलेला नसतो, त्यावेळी वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तो doer गृहीत धरावा लागतो.
या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
प्रथम वाक्याचा doer लिहावा.
doer म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, doer म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
Accusative Case चे Pronoun | Nominative Case चे Pronoun |
---|---|
me | I |
us | We |
you | You |
him | He |
her | She |
it | It |
them | They |
दुसऱ्या स्थानी Past Participle चे Present Tense (पहिले रूप) लिहावे.
Passive Voice च्या वाक्यात doer म्हणून जर him / her / it / Proper Noun / Singular Common Noun वापरलेले असेल तर To च्या Verb पहिल्या रूपाला s / es / ies यांपैकी योग्य तो प्रत्यय लावावा.
परंतु, doer म्हणून जर us / you / them / Plural Common Noun वापरलेले असेल तर To च्या Verb पहिल्या रूपाला कोणताही प्रत्यय लावू नये.
तिसऱ्या स्थानी Passive Voice च्या वाक्याचा Subject लिहावा.
Subject म्हणून जर Common Noun किंवा Proper Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
Nominative Case चे Pronoun | Accusative Case चे Pronoun |
---|---|
I | me |
We | us |
You | you |
He | him |
She | her |
It | it |
They | them |
चौथ्या स्थानी Passive Voice च्या वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.
मात्र, am / is / are आणि by लिहू नयेत.
-
PassiveThe people are astonished by the Prince working in the palace garden.
-
ActiveThe Prince working in the garden astonishes the people.
-
PassiveHe is taken to the police station.
-
ActiveThe police takes him to the police station.
-
PassiveMy clothes are washed by her.
-
ActiveShe washes my clothes.
-
PassiveA man is given life by a mother.
-
ActiveA mother gives a man life.
-
PassiveWe are protected from all the troubles by God.
-
ActiveGod protects us from all the troubles.