Active Passive Voice आणि Simple Present Tense चा Active Voice हे विषय आधी समजून घ्यावेत, जेणेकरून Simple Present Tense चा Passive Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.

Simple Present Tense मधील Passive Voice – विषय सूची
Simple Present Tense चा “Passive Voice”

इंग्रजी व्याकरणामधील Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.

ज्या वाक्यात am, is किंवा are यांपैकी एखादे To be चे Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत त्याला जोडून एखादे Past Participle वापरलेले असते, त्या वाक्याला Passive Voice चे Simple Present Tense चे वाक्य असे म्हणतात.

Passive Voice ची रचना

इंग्रजी वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object ला कधीही दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करता येत नाही.

मात्र, जेव्हा इंग्रजी वाक्यातील Object वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेले असते आणि अशा वाक्याचा Subject हा वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेला असतो, तेव्हा त्या वाक्याला Passive Voice चे म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात.

जेव्हा Simple Present Tense मधील Passive Voice च्या वाक्याचे रूपांतर Active Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात.

Subject + am / is / are + Past Participle + by + Noun / Pronoun
Passive Voice च्या वाक्यातील doer

Passive Voice च्या रचनेमध्ये वाक्याच्या शेवटी सामान्यतः by हे Preposition आणि त्याला जोडून एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते.

Passive Voice च्या वाक्यातील by + Noun / Pronoun या शब्दसमूहाला doer (डूअर) असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ),
  • Cricket is played regularly by them.
  • त्यांच्याकडून नियमितपणे क्रिकेट खेळले जाते.

वरील वाक्यामध्ये is या to be च्या verb ला जोडून played हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

वाक्याच्या पहिल्या स्थानी Cricket हे Common Noun वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून them हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

Doer विषयी विशेष टीप

Passive Voice च्या वाक्याचे रूपांतर Active Voice मध्ये करण्यासाठी वाक्यातील doer ची आवश्यकता असते. मात्र, कधीकधी वाक्यात doer वापरलेला असतो आणि कधीकधी doer वापरलेला नसतो.

जेव्हा वाक्यामध्ये doer वापरलेला नसतो, त्यावेळी वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तो doer गृहीत धरावा लागतो.

Active Voice ची रचना करण्याचे नियम

Simple Present Tense मधील Passive Voice च्या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.

नियम १ (पहिले स्थान)

पहिल्या स्थानी वाक्यातील doer लिहावा. मात्र, by लिहून नये.

Doer म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, doer म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Accusative Case चे Pronoun Nominative Case चे Pronoun
me I
us We
you You
him He
her She
it It
them They
नियम २ (दुसरे स्थान)

दुसऱ्या स्थानी वाक्यातील Past Participle चे Present Tense (पहिले रूप) लिहावे.

तसेच, वाक्यातील am, is किंवा are यांपैकी वापरलेले to be चे verb काढून टाकावे.

Passive Voice च्या वाक्यातील Doer लक्षात घेऊन To च्या Verb पहिल्या रूपाला योग्य तो प्रत्यय पुढीलप्रमाणे लावावा.

Doer To च्या Verb चा प्रत्यय
him s, es किंवा ies
her
it
Singular Number Noun
us प्रत्यय नाही
you
them
Plural Number Noun
नियम ३ (तिसरे स्थान)

तिसऱ्या स्थानी Passive Voice च्या वाक्यातील Subject लिहावा.

Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.

परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.

Nominative Case चे Pronoun Accusative Case चे Pronoun
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
नियम ४ (चौथेे स्थान)

चौथ्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत. मात्र, am, is, are आणि by  लिहू नयेत.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
Passive Voice We are protected by God.
Active Voice God protects us.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये are  या to be च्या verb ला जोडून protected  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून God  हे Noun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 2
Passive Voice He is taken to the police station.
Active Voice The policeman takes him to the police station.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये is  या to be च्या verb ला जोडून taken  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

या वाक्यामध्ये doer वापरलेला नसल्यामुळे Active Voice ची रचना करताना वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन policeman हा doer गृहीत धरलेला आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 3
Passive Voice The people are astonished by the prince working in the palace garden.
Active Voice The prince working in the palace garden astonishes the people.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये are  या to be च्या verb ला जोडून astonished  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून prince  हे Noun वापरलेले आहे आणि त्याला जोडून working in the palace garden ही Adjective Phrase वापरलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण शब्दसमूहाला वाक्यातील doer समजावे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 4
Passive Voice A man is given life by a mother.
Active Voice A mother gives a man life.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये is  या to be च्या verb ला जोडून given  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून mother  हे Noun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 5
Passive Voice My clothes are washed by her.
Active Voice She washes my clothes.

वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये are  या to be च्या verb ला जोडून washed  हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.

तसेच, वाक्याच्या शेवटी by  या Preposition ला जोडून her  हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.

वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.

या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.

Example 6
Passive Voice Breakfast is prepared on Sunday by Satish.
Active Voice Satish prepares breakfast on Sunday.
Example 7
Passive Voice Cattle are bred for living by him.
Active Voice He breeds cattle for living.
Example 8
Passive Voice Football is played on weekends by us.
Active Voice We play football on weekends.

This article has been first posted on and last updated on by