Adjective Clause – विषय सूची

Analysis of Complex Sentence हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Adjective Clause समजून घेणे अधिक सोपे होईल.

Adjective Clause – Second Group

इंग्रजी व्याकरणातील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) मध्ये जे गौणवाक्य Adjective म्हणून वापरलेले असते, त्याला Adjective Clause (ऍड्जिक्टिव्ह क्लॉज्) म्हणजेच विशेषणवाचक गौणवाक्य असे म्हणतात.

या प्रकारच्या Adjective Clause मध्ये Second Group (सेकंड ग्रुप) म्हणजेच दुसऱ्या गटाच्या Relative Pronouns चा उपयोग केलेला असतो.

‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’

Adjective Clause ची रचना असलेल्या Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग करतात, त्याला Relative Pronoun (रिलेटिव्ह प्रोनाऊन) असे म्हणतात.

अशा वाक्यातील Relative Pronoun ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.

गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.

तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.

Adjective Clause मधील Relative Pronoun
दुसऱ्या गटाची Relative Pronouns

दुसऱ्या गटाच्या Relative Pronouns मध्ये when (व्हेन), where (व्हेअर) आणि why (व्हाय) या Pronouns चा समावेश होतो.

दुसऱ्या गटाच्या Relative Pronoun पासून सुरु झालेल्या Subordinating Clause चा संबंध जर एखाद्या Noun शी येत असेल, तरच त्या गटांतील शब्दाला Relative Pronoun असे म्हणतात.

परंतु हा Subordinating Clause जर एखाद्या Transitive Verb ला जोडलेला असेल, तर मात्र या शब्दाला Relative Pronoun असे न म्हणता Subordinating Conjunction असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ),
  • The house where the accident occurred is nearby.
  • अपघात झालेले घर जवळच आहे.

वरील वाक्यामध्ये ‘The house is nearby’ आणि ‘the accident occurred’ या दोन वाक्यांमधील परस्परसंबंध दर्शविण्यासाठी where (व्हेअर) हे Relative Pronoun वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य समजावे.

तसेच, ‘where the accident occurred’ हा संपूर्ण शब्दसमूह house या नामाचे विशेषण म्हणून वापरलेला असल्यामुळे या शब्दसमूहाला Adjective Clause असे म्हणतात.

या वाक्याचे पृथक्करण केल्यास वाक्याची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते –

Main Clause: The house is nearby
Subordinating Clause: where the accident occurred
Relative Pronoun: where
when, where आणि why

या adjective clause च्या रचनेमध्ये ‘when’ हे relative pronoun नेहमी एखाद्या ‘कालदर्शक Noun’ ला जोडलेले असते.

या रचनेमध्ये ‘where’ हे relative pronoun नेहमी एखाद्या ‘स्थलदर्शक Noun’ ला जोडलेले असते.

तसेच, या रचनेमध्ये ‘why’ हे relative pronoun नेहमी ‘reason’ किंवा ‘cause’ यांपैकी एखाद्या noun ला जोडलेले असते.

पहिल्या स्थानातील Adjective Clause

वाक्याच्या सुरूवातीला वापरलेल्या Noun ला जोडून जेव्हा एखादे Relative Pronoun वापरलेले असते, तेव्हा ते Noun आणि Relative Pronoun पासून सुरू होणारा Subordinating Clause हा संपूर्ण शब्दसमूह हा त्या वाक्याचा Subject म्हणून वापरलेला असतो.

वाक्यातील दोन Verbs:

अशा वाक्यामध्ये दोन Verbs वापरलेली असतात. त्यामुळे या वाक्यातील Main Clause आणि Subordinating Clause ओळखण्यासाठी वाक्यातील दोन्हीही Verbs निश्चित करणे आवश्यक असते.

Main Clause:

अशाप्रकारे दोन्हीही Verbs निश्चित केल्यानंतर दुसरे Verb आणि त्यानंतरचे उरलेले संपूर्ण वाक्य हे Main Clause चा भाग समजावे.

म्हणजेच, Main Clause लिहिताना वाक्याच्या सुरूवातीचे Noun, वाक्यातील दुसरे Verb आणि त्यानंतरचे उरलेले वाक्य इतका लिहावा.

Subordinating Clause:

त्याचप्रमाणे, Subordinating Clause लिहिताना वाक्यातील Relative Pronoun आणि त्याला जोडून वापरलेला दुसऱ्या Verb पर्यंतचा शब्दसमूह लिहावा.

For example (उदाहरणार्थ),
  • The house where the accident occurred is nearby.
  • अपघात झालेले घर जवळच आहे.

वरील वाक्यामध्ये दोन वाक्यांमधील परस्परसंबंध दर्शविण्यासाठी where (व्हेअर) हे Relative Pronoun वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य समजावे.

या वाक्यामध्ये ‘where the accident occurred’ हा संपूर्ण शब्दसमूह ‘house’ या नामाचे विशेषण म्हणून वापरलेला असल्यामुळे या शब्दसमूहाला Adjective Clause असे म्हणतात.

तसेच, या वाक्यामध्ये ‘occurred’ हे पहिले तर ‘is’ हे दुसरे verb वापरलेले आहेत.

या वाक्याचे पृथक्करण केल्यास वाक्याची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते –

Main Clause: The house is nearby
Subordinating Clause: where the accident occurred
Relative Pronoun: where
तिसऱ्या स्थानातील Adjective Clause

जेव्हा वाक्यातील Relative Pronoun हे वाक्याच्या मध्यभागी वाक्यातील Main Verb नंतर तिसऱ्या स्थानी वापरलेले असते, तेव्हा ते Relative Pronoun ज्या Noun ला जोडलेले असते, ते Noun वाक्यातील Main Verb नंतर वापरलेले असते.

Main Clause:

अशाप्रकारे Relative Pronoun जेव्हा मध्यभागी वाक्यातील Main Verb नंतर तिसऱ्या स्थानी येते, तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला असलेला संपूर्ण शब्दसमूह हा Main Clause असतो.

Subordinating Clause:

तसेच, Relative Pronoun च्या उजव्या बाजूला असलेला संपूर्ण शब्दसमूह हा Subordinating Clause असतो.

For example (उदाहरणार्थ),
  • We were curious about the reason why he didn't turn up the whole day.
  • तो संपूर्ण दिवसभर का नाही आला याच्या कारणासंबंधी आम्हाला कुतूहल होते.

वरील वाक्यामध्ये दोन वाक्यांमधील परस्परसंबंध दर्शविण्यासाठी why (व्हाय) हे Relative Pronoun वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य समजावे.

या वाक्यामध्ये ‘why he didn't turn up the whole day’ हा संपूर्ण शब्दसमूह ‘the reason’ या नामाचे विशेषण म्हणून वापरलेला असल्यामुळे या शब्दसमूहाला Adjective Clause असे म्हणतात.

तसेच, या वाक्यामध्ये why पासूनचा संपूर्ण शब्दसमूह ‘were’ या main verb नंतर वापरलेला आहे.

या वाक्याचे पृथक्करण केल्यास वाक्याची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते –

Main Clause: We were curious about the reason
Subordinating Clause: why he didn't turn up the whole day
Relative Pronoun: why
For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • The time when the boat leaves is not yet fixed.
  • Main Clause The time is not yet fixed
  • Subordinating Clause when the boat leaves
  • Adjective Clause qualifying the noun ‘the time’ in the Main Clause
Example 2
  • The reason why I did it was obvious.
  • Main Clause The reason was obvious
  • Subordinating Clause why I did it
  • Adjective Clause qualifying the noun ‘the reason’ in the Main Clause
Example 3
  • They wasted their hours when they worked with no result.
  • Main Clause They wasted their hours
  • Subordinating Clause when they worked with no result
  • Adjective Clause qualifying the noun ‘hours’ in the Main Clause

This article has been first posted on and last updated on by