Adjective Clause – विषय सूची

Analysis of Complex Sentence हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Adjective Clause समजून घेणे अधिक सोपे होईल.

इंग्रजी व्याकरणातील ‘Adjective Clause’

इंग्रजी व्याकरणातील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) मध्ये जे गौणवाक्य Adjective म्हणून वापरलेले असते, त्याला Adjective Clause (ऍड्जिक्टिव्ह क्लॉज्) म्हणजेच विशेषणवाचक गौणवाक्य असे म्हणतात.

‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’

Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.

अशा वाक्यातील Subordinating Conjunction ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.

गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.

तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.

Adjective Clause ची रचना

Adjective Clause ची रचना नेहमी एखाद्या Complex Sentence मध्ये वापरलेली असते.

Adjective Clause ची रचना असलेल्या Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग करतात, त्याला Relative Pronoun (रिलेटिव्ह प्रोनाऊन) असे म्हणतात.

अशा वाक्यामध्ये Relative Pronoun चा उपयोग Subordinating Conjunction म्हणून केलेला असतो.

For example (उदाहरणार्थ),
  • The house that he built collapsed yesterday.
  • त्याने बांधलेले घर काल कोसळले.

वरील वाक्यामध्ये ‘The house collapsed yesterday’ आणि ‘he built’ या दोन वाक्यांमधील परस्परसंबंध दर्शविण्यासाठी that (दॅट्) हे Relative Pronoun वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य समजावे.

तसेच, ‘that he built’ हा संपूर्ण शब्दसमूह house या नामाचे विशेषण म्हणून वापरलेला असल्यामुळे या शब्दसमूहाला Adjective Clause असे म्हणतात.

या वाक्याचे पृथक्करण केल्यास वाक्याची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते –

Main Clause: The house collapsed yesterday
Subordinating Clause: that he built
Relative Pronoun: that

इंग्रजी व्याकरणातील Relative Pronouns ची विभागणी त्यांच्या वाक्यातील उपयोगानुसार आणि अर्थानुसार दोन गटांमध्ये केलेली आहे. त्यामुळे Adjective Clause ची विभागणी पुढीलप्रमाणे दोन भागात होते.

Adjective Clause - First Group
पहिल्या गटाची Relative Pronouns

यांमध्ये that, which, who, whom, whose यांचा समावेश होतो.

Adjective Clause - First Group
Adjective Clause - Second Group
दुसऱ्या गटाची Relative Pronouns

यांमध्ये when, where, why यांचा समावेश होतो.

Adjective Clause - Second Group

This article has been first posted on and last updated on by