Analysis of Complex Sentence – विषय सूची

Analysis of Complex Sentence हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Noun Clause समजून घेणे अधिक सोपे होईल.

इंग्रजी व्याकरणातील ‘Noun Clause’

इंग्रजी व्याकरणातील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) मध्ये जे गौणवाक्य Noun म्हणून वापरलेले असते, त्याला Noun Clause (नाऊन क्लॉज्) म्हणजेच नामवाचक गौणवाक्य असे म्हणतात.

‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’

Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.

अशा वाक्यातील Subordinating Conjunction ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.

गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.

तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.

Noun Clause ची रचना

Noun Clause ची रचना नेहमी एखाद्या Complex Sentence मध्ये वापरलेली असते.

For example (उदाहरणार्थ),
  • She doesn't know when he will return.
  • तो कधी परतेल हे तिला माहित नाही.

वरील वाक्यामध्ये ‘She doesn't know’ आणि ‘he will return’ या दोन वाक्यांना जोडण्यासाठी when (व्हेन) हे Subordinating Conjunction वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य समजावे.

तसेच, ‘when he will return’ हा संपूर्ण शब्दसमूह Noun म्हणून वापरलेला असल्यामुळे या शब्दसमूहाला Noun Clause असे म्हणतात.

या वाक्याचे पृथक्करण केल्यास वाक्याची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते –

Main Clause: She doesn't know
Subordinating Clause: when he will return
Subordinating Conjunction: when

इंग्रजी व्याकरणातील Noun Clause ची विभागणी पुढीलप्रमाणे सहा भागात केलेली आहे.

Noun Clause as Object of Verb

या वाक्यातील Main Clause मधील क्रियादर्शक to चे verb हे नेहमी transitive (ट्रान्झिटिव्ह) म्हणजेच सकर्मक असते.

Noun Clause as Object of Verb
Noun Clause as Subject of Verb

या वाक्याची सुरूवात Subordinating Conjunction ने केलेली असते.

Noun Clause as Subject of Verb
Noun Clause as Object of Preposition

या वाक्यातील Subordinating Clause चा संबंध Main Clause मधील Preposition शी असतो.

Noun Clause as Object of Preposition
Noun Clause in apposition to Noun or Pronoun

या वाक्यातील Subordinating Clause चा संबंध Main Clause मधील Abstract Noun शी असतो किंवा this / that यांपैकी एखाद्या Pronoun शी असतो.

Noun Clause in apposition to Noun or Pronoun
Noun Clause in apposition to pronoun 'It'

या वाक्यातील Subordinating Clause चा संबंध Main Clause मधील It या Pronoun शी असतो.

Noun Clause in apposition to Pronoun 'It'
Noun Clause as Complement of Verb

या वाक्यातील Subordinating Clause चा संबंध Main Clause मधील to be च्या verb शी असतो.

Noun Clause as Complement of Verb

This article has been first posted on and last updated on by