नियम १

या रचनेमध्ये वाक्याच्या सुरूवातीला Subject म्हणून नेहमी It हे Pronoun वापरलेले असते.

या रचनेमध्ये It चा उल्लेख Impersonal Subject (इम्पर्सनल सब्जेक्ट) असादेखील केला जातो.

नियम २

या रचनेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

It  +  To be चे Verb  +  Adjective  +  of / for  +  Doer + Infinitive

नियम ३

It नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी पुढे दिल्याप्रमाणे एखादे To be चे Verb वापरलेले असते.

Tense (काळ) To be चे Verb
Present Tense is
Past Tense was
Future Tense will be
नियम ४

To be च्या Verb ला जोडून वाक्याच्या तिसऱ्या स्थानी Complement म्हणून good, bad, kind, possible, difficult, necessary, easy असे एखादे Adjective वापरलेले असते.

नियम ५

good / bad / kind यांपैकी एखादे Adjective वापरलेले असल्यास चौथ्या स्थानी of हे Preposition वापरावे लागते.

मात्र, हे सोडून दुसरे एखादे Adjective वापरलेले असल्यास चौथ्या स्थानी for या Preposition चा उपयोग करावा लागतो.

नियम ६

Preposition ला जोडून वाक्यातील Doer (डूअर) वापरलेला असतो आणि त्याला जोडून एखादे Infinitive वापरलेले असते.

Infinitive ला स्वतःचे Object आणि Extension असू शकतात.

Infinitive ने सूचित होणारी क्रिया करण्याचे काम Doer करत असतो.

नियम ७

वाक्यातील Doer हा नेहमी एखाद्या Noun च्या किंवा Accusative Case (द्वितीया विभक्ती) च्या Pronoun च्या स्वरूपात असतो.

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • हा सर्व तपशील तू वहीत लिहून ठेवतोस हे फार चांगले आहे.

  • It is good of you to write down all the details in a notebook.

Ex. 2
  • गरिबांना मदत केलीस तर तो तुझा दयाळूपणा असेल.

  • It will be kind of you to help the poor.

Ex. 3
  • हे गणित सोडवणं तिला शक्य आहे.

  • It is possible for her to solve this mathematical problem.

Ex. 4
  • इतके प्रश्न एका तासात लिहिणे तिला अशक्य आहे.

  • It is impossible for her to write all the questions in an hour.

Ex. 5
  • या सर्व अडचणींना एकट्याने तोंड देणे आम्हाला फार कठीण होते.

  • It was difficult for us to face all the difficulties by ourselves.

Ex. 6
  • दुसऱ्यांचा द्वेष करणे हे आपल्यासाठी फार सोपे असते.

  • It is easy for us to hate others.

Ex. 7
  • माझ्या आईला सोबत करणे मला जरूरीचे आहे.

  • It is necessary for me to accompany my mother.

This article has been first posted on and last updated on by