Nominative Absolute Construction


"having" च्या रचनेचे Simple Sentence



नियम १

Nominative Absolute Construction (नॉमिनेटिव्ह अॅब्सल्यूट् कन्स्ट्रक्शन्) च्या रचनेमध्ये having या Present Participle चा उपयोग केला जातो.

नियम २

सामान्यतः या रचनेचा संबंध Past Tense च्या Verb शी असतो.

Present Tense च्या वाक्यात ही रचना वापरली जात नाही.

नियम ३

Nominative Absolute Construction चा संबंध होऊन गेलेल्या दोन क्रियांशी असतो.

या रचनेचा वापर करताना या दोन क्रियांपैकी कोणती क्रिया प्रथम घडली आणि कोणती क्रिया नंतर घडली, हे लक्षात घ्यावे लागते.

नियम ४

या रचनेमध्ये having चा उपयोग दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी केला जातो.

मात्र तरीही, having च्या रचनेचे वाक्य हे नेहमी Simple Sentence समजले जाते.

नियम ५

दोन वाक्ये having ने एकत्र जोडण्यासाठी दोन्ही क्रिया करणाऱ्या व्यक्ती अर्थात वाक्यांचे Subjects हे Common (समान) आहेत कि Uncommon (असमान) आहेत, हे लक्षात घ्यावे लागते.

नियम ६

जेव्हा दोन्ही क्रिया करणाऱ्या व्यक्ती Common (समान) असतात, तेव्हा पहिल्या वाक्याची सुरूवात Having ने करावी आणि त्याला प्रथम घडत असलेल्या क्रियेचे Past Participle जोडावे.

Past Participle ला जोडून त्याचे Object, Extension इत्यादी लिहावेत.

त्यानंतर Comma (स्वल्पविराम) करावा आणि दुसऱ्या क्रियेचे वाक्य Verb पासून आहे तसेच लिहावे.

नियम ७

परंतु, जेव्हा दोन्ही क्रिया करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या Uncommon (असमान) असतात, तेव्हा प्रथम घडत असलेल्या क्रियेचा Subject लिहावा, त्याला जोडून having लिहावे आणि प्रथम घडत असलेल्या क्रियेचे Past Participle लिहावे.

Past Participle ला जोडून त्याचे Object, Extension इत्यादी लिहावेत.

त्यानंतर Comma (स्वल्पविराम) करावा आणि दुसऱ्या क्रियेचे वाक्य Subject पासून आहे तसेच लिहावे.

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • पोलीस येऊन पोहोचले आणि जमाव पांगला.

  • The police having arrived, the crowd dispersed.

Ex. 2
  • वर्गशिक्षक वर्गात शिरले आणि सर्व विद्यार्थी त्यांना आदर दाखविण्याकरिता उभे राहिले.

  • The class-teacher having entered the class, all the students rose to their feet to show respect for him.

Ex. 3
  • शत्रूने किल्ल्याला वेढा घातला आणि मग त्याने त्यावर हल्ला चढविला.

  • Having besieged the fort, the enemy mounted an attack on it.

Ex. 4
  • राजेशने नदीत उडी मारली आणि तो त्या बुडणाऱ्या मुलाच्या दिशेने पोहू लागला.

  • Having jumped into the river, Rajesh swam towards the sinking boy.

Ex. 5
  • आई गाढ झोपली आणि मीनाने सर्व स्वयंपाकघर स्वच्छ केले.

  • Mother having been fast asleep, Meena cleaned all the kitchen.

This article has been first posted on and last updated on by