Adjective Phrase


विशेषणात्मक वाक्यांश


नियम १

इंग्रजी वाक्यामध्ये Adjective म्हणून वापरल्या जाणाऱ्या Phrase ला Adjective Phrase (अॅड्जेक्टिव्ह फ्रेज) असे म्हणतात.

नियम २

जेव्हा एखादे Adjective वाक्यात वापरले जाते, तेव्हा त्याचा उद्देश त्या वाक्यात वापरलेल्या एखाद्या Noun किंवा Pronoun बद्दल अधिक माहिती सांगणे आणि त्याला अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त करून देणे हा असतो.

नियम ३

अशी माहिती देणारे Adjective हे एखाद्या Adjective Phrase च्या स्वरूपातसुद्धा असू शकते.

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • You can put down the books in your hands.
  • तुझ्या हातांत असलेली पुस्तकं तू खाली ठेवू शकतोस.
Ex. 2
  • The girl in the yellow saree is my sister.
  • पिवळ्या रंगाची साडी नेसलेली ती मुलगी माझी बहिण आहे.
Ex. 3
  • Mother has kept the sweets in the last compartment on the shelf.
  • फडताळावरच्या शेवटच्या कप्प्यात आईने मिठाई ठेवली आहे.
Ex. 4
  • The lamp on the table is not working.
  • टेबलवरचा दिवा लागत नाहीये.

This article has been posted on and last updated on by