Adverb Phrase


क्रियाविशेषणात्मक वाक्यांशनियम १

इंग्रजी वाक्यामध्ये Adverb म्हणून वापरल्या जाणाऱ्या Phrase ला Adverb Phrase (अॅड्व्हर्ब फ्रेज) असे म्हणतात.

नियम २

Adverb Phrase हा दोन/तीन शब्दांचा समूह असतो आणि त्याची सुरूवात सामान्यतः एखाद्या Preposition ने केलेली असते.

नियम ३

Adverb Phrase चा संबंध To च्या Verb शी असतो.

To च्या Verb ने सूचित होणाऱ्या क्रियेची अधिक माहिती Adverb Phrase देते.

नियम ४

Adverb Phrase ला कधीकधी वाक्याचे Extension (एक्सटेन्शन) म्हणजे वाक्याचा विस्तार असेही म्हटले जाते.

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • Father has brought different kinds of flowering trees from the nursery.
  • बाबांनी वृक्षवाटीकेतून वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आणली आहेत.
Ex. 2
  • Monkeys jump from one branch to another.
  • माकडे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतात.
Ex. 3
  • A boy was walking along the road.
  • एक मुलगा रस्त्याच्या कडेने चालत होता.
Ex. 4
  • I will meet the principal between three and four today.
  • प्राचार्यांना मी उद्या तीन आणि चार च्या दरम्यान भेटेन.

This article has been first posted on and last updated on by