Adverb Clause of Place – विषय सूची

Analysis of Complex Sentence आणि Adverb Clause हे विषय आधी समजून घ्यावेत, जेणेकरून Adverb Clause of Place समजून घेणे अधिक सोपे होईल.

Adverb Clause of Place

इंग्रजी व्याकरणातील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) मध्ये जे गौणवाक्य adverb म्हणून वापरलेले असते, त्याला Adverb Clause (ऍड्व्हर्ब क्लॉज्) म्हणजेच क्रियाविशेषणवाचक गौणवाक्य असे म्हणतात.

अशा Adverb Clause चा उपयोग वाक्यामध्ये जेव्हा Adverb of Place (ऍड्व्हर्ब ऑफ प्लेस) म्हणून केलेला असतो, तेव्हा त्या Adverb Clause ला Adverb Clause of Place (ऍड्व्हर्ब क्लॉज् ऑफ प्लेस) म्हणजेच स्थलदर्शक क्रियाविशेषणवाचक गौणवाक्य असे म्हणतात.

‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’

Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.

अशा वाक्यातील Subordinating Conjunction ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.

गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.

तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.

Adverb Clause of Place ची रचना

Adverb Clause of Place ची रचना नेहमी एखाद्या Complex Sentence मध्ये वापरलेली असते.

वाक्यातील घडत असलेली क्रिया कुठे घडत आहे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी Adverb Clause of Place चा उपयोग केला जातो.

या रचनेमधील Subordinating Clause ची सुरूवात नेहमी पुढीलपैकी एखाद्या Subordinating Conjunction ने केलेली असते.

  • where (व्हेअर)जिथे...तिथे
  • wherever (व्हेरेवर)जिथे जिथे...तिथे तिथे
  • whence (व्हेन्स)जेथून...तेथे
  • whither (व्हिदर)जिथे जिथे...तिथे तिथे
For example (उदाहरणार्थ),
  • I will go whither you go.
  • तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे मी येईन.

वरील वाक्यामध्ये ‘I will go’ आणि ‘you go’ या दोन वाक्यांना जोडण्यासाठी whither (व्हिदर) हे Subordinating Conjunction वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य समजावे.

तसेच, ‘whither you go’ हा संपूर्ण शब्दसमूह स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरलेला आहे.

त्यामुळे, या Subordinating Clause ला Adverb Clause of Place असे म्हणतात.

या वाक्याचे पृथक्करण पुढीलप्रमाणे करता येते –

  • Main Clause  I will go
  • Subordinating Clause  whither you go
  • Adverb Clause of Place modifying the verb ‘will go’ in the Main Clause
‘where’ चा Subordinating Clause

ज्या Subordinating Clause ची सुरुवात where या Subordinating Conjunction ने केलेली असते, तो एकतर Noun Clause असतो, Adjective Clause असतो किंवा Adverb Clause of Place असू शकतो.

‘where’ चा Noun Clause

‘where’ चा संबंध जेव्हा Main Clause मधील Transitive Verb शी जोडलेला असतो, तेव्हा तो Subordinating Clause हा नेहमी Noun Clause as Object of Verb समजावा.

‘where’ चा Adjective Clause

‘where’ चा संबंध जेव्हा Main Clause मधील एखाद्या स्थलदर्शक Noun शी जोडलेला असतो, तेव्हा तो Subordinating Clause हा नेहमी Adjective Clause of Second Group समजावा.

‘where’ चा Adverb Clause

मात्र, जेव्हा ‘where’ चा संबंध Main Clause मधील कोणत्याही स्थलदर्शक Noun शी किंवा Transitive Verb शी जोडलेला नसतो, तेव्हा त्या Subordinating Clause ला Adverb Clause of Place असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ),
  • They can stay where they are.
  • ते जेथे आहेत तेथे राहू शकतात.

वरील वाक्यामध्ये ‘They can stay’ आणि ‘they are’ या दोन वाक्यांना जोडण्यासाठी where (व्हेअर) हे Subordinating Conjunction वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence समजावे.

या Complex Sentence मध्ये ‘where they are’ या संपूर्ण शब्दसमूहाचा उपयोग Adverb of Place म्हणून केलेला आहे.

या वाक्याचे पृथक्करण पुढीलप्रमाणे करता येते –

  • Main Clause  They can stay
  • Subordinating Clause  where they are
  • Adverb Clause of Place modifying the verb ‘can stay’ in the Main Clause
For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • I have put it where I can find it again.
  • Main Clause  I have put it
  • Subordinating Clause  where I can find it again
  • Adverb Clause of Place modifying the verb ‘have put’ in the Main Clause
Example 2
  • He led the travellers wherever they wanted to go.
  • Main Clause  He led the travellers
  • Subordinating Clause  wherever they wanted to go
  • Adverb Clause of Place modifying the verb ‘led’ in the Main Clause
Example 3
  • Go quickly whence you came.
  • Main Clause  Go quickly
  • Subordinating Clause  whence you came
  • Adverb Clause of Place modifying the verb ‘go’ in the Main Clause
Example 4
  • I will go whither you go.
  • Main Clause  I will go
  • Subordinating Clause  whither you go
  • Adverb Clause of Place modifying the verb ‘will go’ in the Main Clause
Example 5
  • Some seeds fell where there was no earth.
  • Main Clause  Some seeds fell
  • Subordinating Clause  where there was no earth
  • Adverb Clause of Place modifying the verb ‘fell’ in the Main Clause

This article has been first posted on and last updated on by