Adjective of Quality म्हणजे काय?

वाक्यातील एखाद्या Noun ची अधिक माहिती देताना जे Adjective त्या Noun चा एखादा विशेष गुण अथवा प्रकार दर्शविण्यासाठी वापरलेले असते, अशा Adjective ला Adjective of Quality (ऍड्जेक्टिव्ह ऑफ क्वॉलिटी) म्हणजेच गुणदर्शक विशेषण किंवा गुणवाचक विशेषण असे म्हणतात.

नियम १

Adjective of Quality चा उपयोग वाक्यातील एखाद्या Noun चे वर्णन करण्यासाठी किंवा त्याची स्थिती दर्शविण्यासाठी देखील करता येतो.

नियम २

Adjective of Quality चा उल्लेख करण्यासाठी Qualitative Adjective (क्वॉलिटेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) हि संज्ञासुद्धा वापरली जाते.

Adjective
(विशेषण)
Usage in a sentence
(वाक्यातील उपयोग)
beautiful a beautiful flower
(सुंदर फुल)
brave a brave boy
(धाडसी मुलगा)
tame a tame cat
(पाळीव मांजर)
careful a careful worker
(सावध असलेला कामगार)
large a large field
(मोठे शेत)
black a black horse
(काळ्या रंगाचा घोडा)
fat a fat boy
(लठ्ठ मुलगा)
fresh a fresh water
(ताजे पाणी)
short a short girl
(उंचीने कमी असलेली मुलगी)

This article has been first posted on and last updated on by