Compound Preposition “around”

around (अराउंड) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये around चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये around चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

around = सभोवती, आसपास, आजूबाजूला

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • They were sitting around the kitchen table.
  • ते स्वयंपाकघरातील टेबलाच्या सभोवती बसले होते.
Example 2
  • There are many trees around our school building.
  • आमच्या शाळेच्या इमारतीच्या आजूबाजूला बरीच झाडं आहेत.

around = सुमारे

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He reached around two hours late.
  • तो सुमारे दोन तास उशिराने पोहोचला.
Example 2
  • She gets a salary of around thirty thousand rupees per month.
  • तिला दरमहा सुमारे तीस हजार रुपये पगार मिळतो.

This article has been first posted on and last updated on by