Future Continuous Tense

Future Continuous Tense (फ्यूचर कंटिन्यूअस टेन्स) म्हणजे चालू / अपूर्ण भविष्यकाळ होय.

जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळात केव्हा तरी निश्चित घडत असेल असे आपल्याला खात्रीपूर्वक वाटते, तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी Future Continuous Tense चा उपयोग करतात.

नियम १

इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा shall be किंवा will be यांपैकी एक Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे Present Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Future Continuous Tense चे वाक्य असे म्हणतात.

नियम २

जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी असेन / असू / असशील / असाल / असेल / असतील  यांपैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Future Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
  • ते रविवारी घर स्वच्छ करत असतील.
  • They will be cleaning the house on Sunday.

वरील मराठी वाक्यामध्ये असतील  हे क्रियापद वापरलेले असून त्याच्याआधी "त" च्या बाराखडीतील स्वच्छ करत हे "वर्तमानकालवाचक धातुसाधित" वापरलेले आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Future Continuous Tense चा उपयोग करावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • तो आपला स्वतःचा व्यवसाय चालवित असेल.
  • He will be running his own business.
Example 2
  • तुम्ही वर्गात नवीन विषय शिकत असाल.
  • You will be learning a new topic in the class.
Example 3
  • मी तुझी विमानतळावर वाट बघत असेन.
  • I shall be waiting for you at the airport.
Example 4
  • उद्या आम्ही गोव्यामध्ये फिरत असू.
  • We shall be roaming around in Goa tomorrow.
Example 5
  • उद्या ते विमानाने प्रवास करत असतील.
  • They will be travelling by air tomorrow.

This article has been first posted on and last updated on by