Adjective of Quantity


परिमाणदर्शक विशेषण


नियम १

कोणत्याही Quantity (क्वान्टिटी) म्हणजेच परिमाण दर्शविणाऱ्या शब्दापासून तयार होणाऱ्या Adjective ला परिमाणदर्शक विशेषण अर्थात Adjective of Quantity (अॅड्जेक्टिव्ह ऑफ क्वान्टिटी) असे म्हणतात.

नियम २

हे Adjective नेहमी संख्येत मोजता न येणाऱ्या म्हणजे Uncountable (अन्काऊंटेबल) Noun ला जोडूनच वापरलेले असते, हे लक्षात ठेवावे.

हे Uncountable Noun एकतर Material Noun असते किंवा ते Abstract Noun असू शकते.

नियम ३

Adjective of Quantity चा उल्लेख करण्यासाठी Quantitative Adjective (क्वान्टिटेटिव्ह अॅड्जेक्टिव्ह) हि संज्ञासुद्धा वापरली जाते.

नियम ४

एखाद्या भावनेची तीव्रता (degree) किंवा एखाद्या पदार्थाचे परिमाण (quantity) यांचा उल्लेख करताना ते "किती" (how much) आहे, हे जेव्हा सांगायचे असते, तेव्हा Adjective of Quantity चा उपयोग केला जातो.

नियम ५

या प्रकारामध्ये much, little, no, some, any, enough, sufficient, all, whole, half या प्रमुख Adjectives चा समावेश होतो.

For Example (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • There is some milk in the pot.
  • पातेल्यात थोडं दूध आहे.
Ex. 2
  • There is no water in the glass.
  • पेल्यात काहीच पाणी नाहीये.
Ex. 3
  • His speech did not have much influence on people.
  • लोकांवर त्याच्या भाषणाचा जास्त प्रभाव पडला नाही.
Ex. 4
  • He had enough fuel in his bike to travel for another hour.
  • अजून एखादा तास प्रवास करण्यासाठी त्याच्या दुचाकीमध्ये पुरेसे इंधन होते.

This article has been posted on and last updated on by