Interrogative Adjective


प्रश्नार्थक विशेषण


नियम १

Interrogative Adjective (इंटरॉगेटिव्ह अॅड्जेक्टिव्ह) चा मराठी अर्थ प्रश्नार्थक विशेषण असा आहे.

या Adjective चा उपयोग नेहमी प्रश्नार्थक वाक्यामध्येच केलेला असतो, हे लक्षात ठेवावे.

नियम २

यांमध्ये which (व्हिच) आणि what (व्हॉट) या दोन Adjectives चा समावेश होतो.

नियम ३

कोणत्याही प्रश्नार्थक वाक्यामध्ये जेव्हा which किंवा what एखाद्या Noun ला जोडून वापरलेले असते, तेव्हा त्याला Interrogative Adjective असे म्हणतात.

नियम ४

which चा उपयोग एखाद्या विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी (selective sense) केलेला असतो, तर what चा उपयोग सर्वसाधारण अर्थाने (general sense) करण्यात येतो.

For Example (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • What book are you looking for?
  • तुम्ही कोणते पुस्तक शोधत आहात?
Ex. 2
  • Which book do you like the most?
  • तुम्हाला कोणते पुस्तक सर्वात जास्त आवडते?
Ex. 3
  • What recipe was selected in the finals?
  • अंतिम फेरीसाठी कोणती पाकक्रिया निवडली गेली?
Ex. 4
  • Which bowler has taken the most number of wickets in one day international cricket?
  • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या गोलंदाजाने सर्वात जास्त बळी घेतले आहेत?

This article has been posted on and last updated on by