Possessive Adjective


षष्ठी विभक्तीचे विशेषणPossessive Adjective म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या संदर्भात Possession (पजेशन) म्हणजेच मालकी अथवा स्वामित्व दर्शविण्यासाठी जे Adjective वापरले जाते, त्याला Possessive Adjective (पजेसिव्ह ऍड्जेक्टिव्ह) अर्थात षष्ठी विभक्तीचे विशेषण असे म्हणतात.

नियम १

वाक्यातील व्यक्ती किंवा गोष्टी यांचा उल्लेख करताना त्या कोणाच्या आहेत, हे जेव्हा सांगायचे असते, तेव्हा Possessive Adjective चा उपयोग केला जातो.

नियम २

Possessive Adjective मध्ये my, your, his, her, its, their या Possessive Case च्या Pronouns चा समावेश होतो.

जेव्हा यांपैकी कोणतेही Pronoun एखाद्या Noun ला जोडून वापरलेले असते, तेव्हा त्याला Possessive Adjective अशी संज्ञा दिली जाते.

For example (उदाहरणार्थ),
Possessive Case चे
Pronoun
Noun Possessive
Adjective
her
(तिचा)
husband
(नवरा)
her husband
(तिचा नवरा)
his
(त्याची)
wife
(बायको)
his wife
(त्याची बायको)
their
(त्यांची)
children
(मुले)
their children
(त्यांची मुले)
my
(माझे)
book
(पुस्तक)
my book
(माझे पुस्तक)
its
(त्याचे)
tail
(शेपूट)
its tail
(त्याचे शेपूट)
our
(आमची)
houses
(घरे)
our houses
(आमची घरे)
नियम ३
Apostrpohe (') + s बद्दल

जेव्हा एखाद्या Noun ला Apostrpohe (') + s (ऍपॉस्ट्रॉफी आणि एस्) हा प्रत्यय लावलेला असतो आणि जेव्हा ते Noun दुसऱ्या एखाद्या Noun बद्दलचे Possession दर्शविण्यासाठी वापरलेले असते, तेव्हा अशा Noun ला सुद्धा Possessive Adjective असेच म्हणतात.

For example (उदाहरणार्थ),
Noun
(Apostrophe + s)
Noun Possessive
Adjective
Vijay's
(विजयचे)
clothes
(कपडे)
Vijay's clothes
(विजयचे कपडे)
Amit's
(अमितची)
bike
(दुचाकी)
Amit's bike
(अमितची दुचाकी)
bird's
(पक्ष्याचे)
nest
(घरटे)
bird's nest
(पक्ष्याचे घरटे)
नियम ४
शेवटी s अक्षर असल्यास Apostrpohe (') बद्दल

जेव्हा एखाद्या Noun च्या शेवटी s हे अक्षर येते, तेव्हा अशा Noun चा Possessive Adjective म्हणून वापर करण्याकरिता शेवटी फक्त Apostrpohe (') वापरावे.

For example (उदाहरणार्थ),
Noun
(Apostrophe)
Noun Possessive
Adjective
girls'
(मुलींची)
school
(शाळा)
girls' school
(मुलींची शाळा)
wheels'
(चाकांची)
alignment
(सरळ रचना)
wheels' alignment
(चाकांची सरळ रचना)
potatoes'
(बटाट्यांची)
recipe
(पाककृती)
potatoes' recipe
(बटाट्यांची पाककृती)
birds'
(पक्ष्यांची)
nests
(घरटी)
birds' nests
(पक्ष्यांची घरटी)

This article has been first posted on and last updated on by