Proper Adjective


विशेषनामापासून तयार होणारे विशेषण


नियम १

Proper Noun पासून तयार होणाऱ्या Adjective ला विशेषनामाचे विशेषण अर्थात Proper Adjective (प्रॉपर अॅड्जेक्टिव्ह) असे म्हणतात.

नियम २

जेव्हा एखादे Proper Noun वाक्यामध्ये स्वतंत्रपणे न वापरता दुसऱ्या एखाद्या Noun किंवा Pronoun बद्दल अधिक माहिती देण्यासाठी वापरलेले असते, तेव्हा त्या Proper Noun ला Proper Adjective असे म्हणतात.

नियम ३

Proper Noun पासून तयार होणारे Proper Adjective हे वाक्यामध्ये जसेच्या तसे न वापरता सामान्यतः त्याला एखादा प्रत्यय लावून वापरलेले असते हे लक्षात ठेवावे.

नियम ४

कोणत्याही Proper Adjective चे पहिले अक्षर नेहमी Capital लिहावे.

Examples (उदाहरणार्थ)
Proper Noun
(विशेषनाम)
Proper Adjective
(विशेषनामाचे विशेषण)
Usage in Sentence
(वाक्यातील उपयोग)
Rome Roman the Roman empire
(रोमचे साम्राज्य)
India Indian the Indian civilization
(भारतीय संस्कृती)
Ganges
(गंगा नदी)
Gangetic the Gangetic plain
(गंगेचे खोरे)
England English the English language
(इंग्रजी भाषा)
Freud
(फ्रॉईड - एक शास्त्रज्ञ)
Freudian
(फ्रॉईडियन)
the Freudian theory
(फ्रॉईडचा सिद्धांत)

This article has been posted on and last updated on by