Adverb of Manner


रीतिवाचक क्रियाविशेषण


नियम १

वाक्यातील घडत असलेली क्रिया कशी / कशा रीतीने (how) घडत आहे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी Adverb of Manner (अॅडव्हर्ब ऑफ मॅनर) म्हणजेच रीतिवाचक क्रियाविशेषण वापरले जाते.

नियम २

या प्रकारामध्ये समाविष्ट असलेले काही Adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Examples (उदाहरणार्थ)
Adverb of Manner
(क्रियाविशेषण)
How to pronounce
(उच्चार)
Meaning
(मराठी अर्थ)
badly बॅड्ली वाईट रीतीने
quickly क्विक्ली पटकन
well वेल् बऱ्यापैकी, चांगले
fast फास्ट वेगाने, जलद रीतीने
slowly स्लोली सावकाशपणे, हळू हळू
sweetly स्वीट्ली गोडपणे
नियम ३

जेव्हा How (हाऊ) हा प्रश्न कशा रीतीने या अर्थाने वापरलेला असतो, तेव्हा या प्रश्नाचा संबंध वाक्यातील Adverb of Manner शी असतो.

या प्रश्नातील Verb ने सूचित होणारी क्रिया वाक्याचा Subject कशी / कशा रीतीने करत आहे, ते Adverb of Manner ने दर्शविलेले असते.

For Example (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • He did his work slowly.
  • त्याने त्याचे काम सावकाशपणे केले.
Ex. 2
  • She was running fast to win the race.
  • शर्यत जिंकण्यासाठी ती खूप वेगाने पळत होती.
Ex. 3
  • They have done well in the examination.
  • त्यांनी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
Ex. 4
  • The fielder threw the ball quickly.
  • क्षेत्ररक्षकाने चेंडू पटकन फेकला.
Ex. 5
  • He has been behaving badly with her.
  • तो तिच्यासोबत वाईट रीतीने वागत आहे.

This article has been posted on and last updated on by