Adverb of Time


कालवाचक क्रियाविशेषण


नियम १

वाक्यातील घडत असलेली क्रिया कधी / केव्हा (when) घडत आहे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी Adverb of Time (अॅडव्हर्ब ऑफ टाईम) म्हणजेच कालवाचक क्रियाविशेषण वापरले जाते.

नियम २

या प्रकारामध्ये समाविष्ट असलेले काही Adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Examples (उदाहरणार्थ)
Adverb
(क्रियाविशेषण)
Pronunciation
(उच्चार)
Meaning
(मराठी अर्थ)
now नाऊ आता
then देन् नंतर
today टुडे आज
tomorrow टुमॉरो उद्या
yesterday येस्टरडे काल
ago अॅगो पूर्वी
soon सून लवकरच
early अर्ली लवकर
नियम ३

जेव्हा When (व्हेन्) हा शब्द कधी / केव्हा या अर्थाने वापरलेला असतो, तेव्हा या प्रश्नाचा संबंध वाक्यातील Adverb of Time शी असतो.

या प्रश्नातील Verb ने सूचित होणारी क्रिया Subject कधी / केव्हा करत आहे, ते Adverb of Time ने दर्शविलेले असते.

For Example (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • Rajesh is reading a book now.
  • राजेश आता एक पुस्तक वाचत आहे.
Ex. 2
  • He reached home late.
  • तो उशीरा घरी पोचला.
Ex. 3
  • We have a holiday tomorrow.
  • आम्हाला उद्या सुट्टी आहे.
Ex. 4
  • He bought a new car yesterday.
  • काल त्याने नवीन गाडी विकत घेतली.
Ex. 5
  • The play will start soon.
  • नाटक लवकरच सुरू होईल.

This article has been posted on and last updated on by