Relative Adverb


संबंधी क्रियाविशेषण अव्यय



Relative Adverb

Relative Adverb (रिलेटिव्ह ऍड्व्हर्ब) म्हणजे संबंधी क्रियाविशेषण अव्यय होय.

Relative Adverb चा उपयोग दोन Sentences एकत्र जोडण्यासाठी केला जातो.

नियम १

Relative Adverb चे स्वरूप हे Interrogative Adverb प्रमाणेच असते.

मात्र, स्वरूप एकसारखे असले तरीसुद्धा दोन्ही प्रकारच्या Adverbs चा वाक्यातील उपयोग वेगवेगळा आहे.

Interrogative Adverb चा उपयोग वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो, तर Relative Adverb चा उपयोग दोन Sentences एकत्र जोडण्यासाठी केला जातो.

नियम २

Relative Adverb चा उपयोग दोन Sentences जोडण्यासाठी केला जात असल्यामुळे त्याला Conjunction असेही म्हटले जाते.

अशाप्रकारे कोणतेही Relative Adverb हे Adverb आणि Conjunction अशा दुहेरी भूमिकेमध्ये  वाक्यामध्ये वापरलेले असते.

इंग्रजी व्याकरणातील काही Relative Adverbs

Relative Adverbs मध्ये समाविष्ट असलेले काही Adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Relative Adverbs
(संबंधी क्रियाविशेषण)
Meaning
(मराठी अर्थ)
where
(व्हेअर)
जेथे
when
(व्हेन)
जेव्हा
why
(व्हाय)
का
For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • १५ ऑगस्ट १९४७ हा तो दिवस होता जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले.
  • 15th August 1947 was the day when India got independence.
Example 2
  • हेच ते घर आहे जेथे मी राहतो.
  • This is the house where I live.
Example 3
  • आज तो अनुपस्थित का आहे त्याचे कारण मला माहित नाही.
  • I do not know the reason why he is absent today.

This article has been first posted on and last updated on by