Coordinating Conjunction


सम-संयोगी उभयान्वयी अव्यय


नियम १

Coordinating Conjunction (कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्) म्हणजे सम-संयोगी उभयान्वयी अव्यय होय.

नियम २

समान दर्जाचे शब्द किंवा Phrases किंवा Simple Sentence यांना जोडण्यासाठी जे Conjunction वापरले जाते, त्याला Coordinating Conjunction असे म्हणतात.

नियम ३

Coordinating Conjunction चा उपयोग पूर्णपणे स्वतंत्र असलेली समान दर्जाची उपवाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी केला जातो.

अशा समान दर्जाच्या उपवाक्यांना इंग्रजी व्याकरणामध्ये Coordinating Clauses (कोऑर्डिनेटिंग क्लॉजेस्) असे म्हणतात.

नियम ४

Coordinating Conjunction चा उपयोग करून तयार झालेल्या वाक्याला Compound Sentence म्हणजेच संयुक्त वाक्य असे म्हणतात.

नियम ५

Coordinating Clauses हि नेहमी स्वतंत्र आणि अर्थपूर्ण वाक्ये असतात.

त्यामुळे त्यांना Principal Clauses (प्रिन्सिपल् क्लॉजेस्) म्हणजेच मुख्यवाक्ये असेही म्हणतात.

For example (उदाहरणार्थ):
  • He is clever but he is not strong.
  • तो हुशार आहे, पण तो धडधाकट नाहीये.

वरील वाक्यामध्ये He is clever आणि he is not strong या दोन Coordinating Clauses म्हणजेच उपवाक्यांना जोडण्याचे काम पण याअर्थी वापरलेले but हे Coordinating Conjunction करत आहे.

List of Coordinating Conjunctions (सम-संयोगी उभयान्वयी अव्यय)

Conjunction
(उभयान्वयी अव्यय)
Marathi Meaning
(मराठी अर्थ)
and आणि
or किंवा, अथवा
but पण, परंतु
so म्हणून, त्यामुळे
either...or दोहोंपैकी एक, हे किंवा ते
neither...nor दोहोंपैकी एकही नाही, हेही नाही आणि तेही नाही

This article has been posted on and last updated on by