Subordinating Conjunction (सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन्) म्हणजे असम-संयोगी उभयान्वयी अव्यय होय.
असमान दर्जाच्या Phrases किंवा Sentences यांना जोडण्यासाठी जे Conjunction वापरले जाते, त्याला Subordinating Conjunction असे म्हणतात.
Subordinating Conjunction चा उपयोग असमान दर्जाची दोन उपवाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी केला जातो.
यामधील स्वतंत्र आणि अर्थपूर्ण असणाऱ्या वाक्याला Principal Clause (प्रिन्सिपल् क्लॉज) म्हणजे मुख्यवाक्य असे म्हणतात.
तर दुसऱ्या वाक्याला Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग क्लॉज) म्हणजे गौणवाक्य असे म्हणतात.
Subordinating Clause च्या गौणवाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ते नेहमी Principal Clause मधील Verb वर अवलंबून असते.
- I knew that he was an honest man.
- मला माहित होतं की तो एक प्रामाणिक माणूस होता.
वरील वाक्यामध्ये I knew हा Principal Clause आणि he was an honest man हा Subordinating Clause यांना एकमेकांशी जोडण्याचे काम that हे Subordinating Conjunction करत आहे.
Subordinating Conjunction चा उपयोग करून तयार झालेल्या वाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य असे म्हणतात.
List of Subordinating Conjunctions (असम-संयोगी उभयान्वयी अव्यय)
Conjunction (उभयान्वयी अव्यय) |
Marathi Meaning (मराठी अर्थ) |
---|---|
unless | नाही...तर |
as | ..मुळे |
though, although | यद्यपि, जरी...असले तरी |
while | ज्यावेळी, जेव्हा |
that | की |
because | कारण |
more...than | पेक्षा अधिक |
if, whether | जर...तर |