Common Noun म्हणजे काय?

आपल्या सभोवती जी वस्तू किंवा जो प्राणी आपल्याला दिसतो, ती प्रत्येक निर्जीव वस्तू किंवा सजीव प्राणी काही ना काही नावाने ओळखला जातो.

अशा प्रत्येक नावाला Common Noun (कॉमन नाऊन) म्हणजेच सामान्यनाम असे म्हणतात.

नियम १

इंग्रजी वाक्यामध्ये अनेक Common Nouns वापरलेली असतात. ती ओळखता येणे आवश्यक असते.

तसेच, वाक्यात वापरलेले Common Noun हे एकवचनी आहे कि अनेकवचनी आहे, हेदेखील लक्षात घ्यावे लागते.

नियम २
Common Noun चे वचन

एकवचनाला इंग्रजी व्याकरणात Singular Number असे म्हणतात आणि अनेकवचनाला Plural Number असे म्हणतात.

सामान्यतः ज्या Common Noun  ला शेवटी s / es / ies / ves यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो, त्याला Plural Number चे Common Noun असे म्हणतात.

काही Common Nouns ही अनियमित असल्यामुळे त्यांचे अनेकवचन करताना Irregular Nouns चे नियम पाळावे लागतात.

For example (उदाहरणार्थ),
Common Noun
(सामान्यनाम)
मराठी अर्थ Number
(वचन)
farmer शेतकरी एकवचन
garden बाग एकवचन
teacher शिक्षक एकवचन
cow गाय एकवचन
cat मांजर एकवचन
parrot पोपट एकवचन
dogs कुत्रे अनेकवचन
wolves कोल्हे अनेकवचन
bench बाक एकवचन
countries देश अनेकवचन
branches फांद्या एकवचन
buffalo म्हैस एकवचन
river नदी एकवचन

This article has been first posted on and last updated on by