Proper Noun


विशेषनाम


नियम १

स्त्री पुरुषांना हाक मारण्यासाठी त्यांना जी नावे ठेवतात, त्या त्यांच्या नावांना Proper Noun (विशेषनाम) असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ), Vijay, Sudhir, Amit, Leela, Radha, Gopal इत्यादी.

नियम २

पाळीव प्राण्यांना हाक मारण्यासाठी आपण त्यांना नावे ठेवतो. पाळीव प्राण्यांना ठेवलेल्या अशा नावांना Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ), Moti, Max, Sheru, Teddy, Lucky, Mani, Tommy इत्यादी.

नियम ३

खेडी, शहरे, प्रांत, वसाहती, राज्ये, देश, खंड ज्या नावांनी ओळखली जातात, त्यांच्या नावांनासुद्धा Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ), Shastri Nagar, Mumbai, Raigad, Maharashtra, Satara, Pune, India, Asia, Africa इत्यादी.

नियम ४

दिशा, उपदिशा, टेकड्या, डोंगर, पर्वत यांच्या नावांना Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ), East, West, North-East, Rajmachi, Himalaya, Alps इत्यादी.

नियम ५

नद्या, तलाव, सरोवरे, पाणवठे, जलाशय, धरणे यांच्या नावांनासुद्धा Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ), Ganga, Godavari, Yamuna, Koyna, Dal Lake, Bhakra Nangal Dam, Morabe Dam इत्यादी.

नियम ६

आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, आकाशगंगा यांच्या ठेवलेल्या नावांना Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ), Orion, Aurora, Earth, Jupiter, Venus, The Milky Way, Krittika, Rohini, Hasta इत्यादी.

नियम ७

महिन्यांच्या आणि दिवसांच्या नावांना Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ), Sunday, Monday, Tuesday, January, February, March इत्यादी.

नियम ८

इमारतींना, बंगल्यांना, रस्त्यांना ठेवलेल्या नावांनासुद्धा Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ), Galaxy Apartments, The Solitaire Heights, Anand Niwas, Lal Bahadur Shastri Road इत्यादी.

नियम ९

या आणि अशा सर्व ठेवलेल्या नावांना Proper Noun असे म्हणतात.

नियम १०

Proper Noun हे नेहमी Singular Number (एकवचनी) असते. ते कधीही Plural Number (अनेकवचनी) नसते.

नियम ११

माणसांच्या आडनावांना सुद्धा Proper Noun असे म्हणतात. परंतु, अपवाद म्हणून हे Proper Noun शेवटी s हा प्रत्यय लावून अनेकवचनी करता येते.

नियम १२

जेव्हा एखाद्या आडनावाला s हा प्रत्यय लावून ते अनेकवचनी केलेले असते, तेव्हा त्याचा अर्थ "संपूर्ण कुटुंब" (Whole Family) असा करतात. अशा अर्थाने जे आडनाव लिहिलेले असते, त्याला नेहमी न विसरता the हे article लावावे.

For example (उदाहरणार्थ), the Patils, the Deshmukhs, the Pawars, the Guravs इत्यादी.

नियम १३

कोणत्याही Proper Noun चे पहिले अक्षर नेहमी Capital लिहावे.

This article has been posted on and last updated on by