Proper Noun म्हणजे काय?

एखाद्या सामान्यनामाच्या ठेवलेल्या विशेष नावाला Proper Noun (प्रॉपर नाऊन) म्हणजेच विशेषनाम असे म्हणतात.

नियम १

कोणत्याही Proper Noun चे पहिले अक्षर नेहमी Capital लिहावे.

नियम २

Proper Noun हे नेहमी Singular Number (एकवचनी) असते. ते कधीही Plural Number (अनेकवचनी) नसते.

नियम ३

स्त्री पुरुषांना हाक मारण्यासाठी त्यांना जी नावे ठेवतात, त्यांच्या त्या नावांना Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – Vijay, Sudhir, Amit, Leela, Radha, Gopal इत्यादी.

नियम ४

पाळीव प्राण्यांना हाक मारण्यासाठी आपण त्यांना नावे ठेवतो. पाळीव प्राण्यांना ठेवलेल्या अशा नावांना Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – Moti, Max, Sheru, Teddy, Lucky, Mani, Tommy इत्यादी.

नियम ५

खेडी, शहरे, प्रांत, वसाहती, राज्ये, देश, खंड ज्या नावांनी ओळखली जातात, त्यांच्या नावांनासुद्धा Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – Shastri Nagar, Mumbai, Raigad, Maharashtra, Satara, Pune, India, Asia, Africa इत्यादी.

नियम ६

दिशा, उपदिशा, टेकड्या, डोंगर, पर्वत यांच्या नावांना Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – East, West, North-East, Rajmachi, Himalaya, Alps इत्यादी.

नियम ७

नद्या, तलाव, सरोवरे, पाणवठे, जलाशय, धरणे यांच्या नावांनासुद्धा Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – Ganga, Godavari, Yamuna, Koyana, Dal Lake, Bhakra Nangal Dam इत्यादी.

नियम ८

आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, आकाशगंगा यांच्या ठेवलेल्या नावांना Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – Orion, Aurora, Earth, Jupiter, Venus, The Milky Way, Krittika, Rohini, Hasta इत्यादी.

नियम ९

महिन्यांच्या आणि दिवसांच्या नावांना Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – Sunday, Monday, Tuesday, January, February, March इत्यादी.

नियम १०

इमारतींना, बंगल्यांना, रस्त्यांना ठेवलेल्या नावांनासुद्धा Proper Noun असे म्हणतात.

For example (उदाहरणार्थ) – Galaxy Apartments, The Solitaire Heights, Anand Niwas, Lal Bahadur Shastri Road इत्यादी.

नियम ११
माणसांच्या आडनावाचे अनेकवचन

माणसांच्या आडनावांना सुद्धा Proper Noun असे म्हणतात. परंतु, अपवाद म्हणून त्याच्या शेवटी s हा प्रत्यय लावून त्याचे अनेकवचन करता येते.

जेव्हा एखाद्या आडनावाला s हा प्रत्यय लावून त्याचे अनेकवचन केलेले असते, तेव्हा त्याचा अर्थ "संपूर्ण कुटुंब" (Whole Family) असा होतो.

अशा अर्थाने s हा प्रत्यय लावून जे आडनाव लिहिलेले असते, त्याला नेहमी न विसरता the हे article (उपपद) लावावे.

For example (उदाहरणार्थ) – the Patils, the Deshmukhs, the Pawars, the Guravs इत्यादी.

This article has been first posted on and last updated on by