Compound Preposition “above”

above (अबव्ह्) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये above चा उपयोग Adjective, Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये above चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

above = वर ("अधांतरी" वर)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • The sky is above our heads.
  • आकाश आपल्या वर (डोक्यावर अधांतरी) आहे.
Example 2
  • The plane is flying above the clouds.
  • विमान ढगांच्या वरून उडत आहे.

"अधांतरी" वर या अर्थी जेव्हा over चा उपयोग वाक्यामध्ये केलेला असतो, तेव्हा above ऐवजी over हे Simple Preposition देखील वापरता येते.

above = वरच्या बाजूला (वरच्या अंगाला)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • There is a waterfall above this spot.
  • या जागेच्या वरच्या बाजूला (वरच्या अंगाला) एक धबधबा आहे.
Example 2
  • Ramesh is above me in the class.
  • वर्गामध्ये तो माझ्या वर (वरच्या बाजूला - अनुक्रमाने किंवा गुणांमध्ये) आहे.

above = पेक्षा अधिक, पेक्षा जास्त

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • There were above fifty people in the hall.
  • दिवाणखान्यात पन्नास पेक्षा जास्त लोक होते.
Example 2
  • The temperature did not rise above ten degrees.
  • तापमान दहा अंशांपेक्षा अधिक वर गेले नाही.

above = पलीकडे गेलेला (कक्षेच्या बाहेर असलेला)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He is above criticism.
  • तो टीकेच्या पलीकडे गेलेला आहे.
Example 2
  • This book is above me.
  • हे पुस्तक माझ्या कक्षेच्या बाहेर (समजूतीच्या पलीकडे) आहे.

This article has been first posted on and last updated on by