against (अगेन्स्ट) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Preposition म्हणून केला जातो.

against हे जेव्हा वाक्यामध्ये Compound Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

विरुद्ध

For example (उदाहरणार्थ):
 • He met them against his will.
 • तो त्यांना त्याच्या इच्छेविरुद्ध भेटला.
 • India will win the first match against England.
 • इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना भारत जिंकेल.
अर्थ २

वर (टेकून, खेटून)

For example (उदाहरणार्थ):
 • He was leaning against the wall.
 • तो भिंतीवर झुकला होता (भिंतीला टेकून उभा होता).
 • She was sitting against the window.
 • ती खिडकीवर (खिडकीला टेकून) बसली होती.
अर्थ ३

वर (..च्या पार्श्वभूमीवर, ..च्या वर उठून)

For example (उदाहरणार्थ):
 • The trees looked dark against the morning sky.
 • सकाळच्या आकाशावर (सकाळच्या आकाशातील रंगांच्या पार्श्वभूमीवर) झाडे गडद दिसत होती.
 • It is difficult to talk against this noise.
 • या आवाजावर (आवाजाच्या वर उठून) बोलणे कठीण आहे.

This article has been first posted on and last updated on by