How to use "among" - Compound Preposition


मध्ये ("अनेकांमध्ये" या अर्थाने)


among (अमंग) किंवा amongst (अमंग्स्ट) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Preposition म्हणून केला जातो.

among / amongst हे जेव्हा वाक्यामध्ये Compound Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ

मध्ये ("अनेकांमध्ये" या अर्थाने)

For example (उदाहरणार्थ):
  • There were fighting amongst themselves.
  • ते आपआपसांत (एकमेकांमध्ये) भांडत होते.
  • The money will be divided among four charitable organizations.
  • ते पैसे चार धर्मादाय संस्थांमध्ये विभागले जातील.

among आणि amongst या दोन्हींचा अर्थ सारखाच आहे.

amongst हे जुन्या पद्धतीचे (old fashioned) Preposition असून त्याचा उपयोग आधुनिक इंग्रजीमध्ये (modern english) फारसा केला जात नाही.

दोनपेक्षा अधिक वस्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये असा उल्लेख करावयाचा असल्यास among वापरावे.

मात्र, फक्त दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती यांच्यामध्ये असा उल्लेख करावयाचा असल्यास नेहमी between चा उपयोग करावा.

This article has been posted on and last updated on by