before (बिफोर) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Conjunction, Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे केला जातो.

before हे जेव्हा वाक्यामध्ये Compound Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

पूर्वी (अगोदर, आधी)

For example (उदाहरणार्थ):
  • She will reach the bus-station before ten o'clock.
  • ती दहा वाजण्याआधी (दहा वाजण्यापूर्वी) बसस्थानकावर पोहोचेल.
  • He had his lunch before noon yesterday.
  • काल तो दुपार होण्यापूर्वीच जेवला.
अर्थ २

समोर (पुढ्यात)

For example (उदाहरणार्थ):
  • The class-teacher asked him to stand before the class.
  • वर्गशिक्षकांनी त्याला वर्गासमोर उभे राहण्यास सांगितले.
  • They stopped before a large white bungalow.
  • ते एका मोठ्या पांढऱ्या बंगल्यासमोर थांबले.
अर्थ ३

पेक्षा अधिक श्रेयस्कर (पेक्षा वरच्या दर्जाचा)

For example (उदाहरणार्थ):
  • It is death before dishonour for any person having self-respect.
  • कोणत्याही स्वाभिमानी व्यक्तीसाठी अपमानापेक्षा मृत्यू हा अधिक श्रेयस्कर आहे.
  • A lieutenant general comes before a colonel in the Indian Army.
  • भारतीय सैन्यात लेफ्टनंट जनरल हा कर्नलपेक्षा वरच्या दर्जाचा (वरच्या अधिकाराचा) असतो.

This article has been first posted on and last updated on by