Compound Preposition “before”

before (बिफोर) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये before चा उपयोग Conjunction, Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये before चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

before = पूर्वी (अगोदर, आधी)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • She will reach the bus-station before ten o'clock.
  • ती दहा वाजण्याआधी (दहा वाजण्यापूर्वी) बसस्थानकावर पोहोचेल.
Example 2
  • He had his lunch before noon yesterday.
  • काल तो दुपार होण्यापूर्वीच जेवला.

before = समोर (पुढ्यात)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • The class-teacher asked him to stand before the class.
  • वर्गशिक्षकांनी त्याला वर्गासमोर उभे राहण्यास सांगितले.
Example 2
  • They stopped before a large white bungalow.
  • ते एका मोठ्या पांढऱ्या बंगल्यासमोर थांबले.

before = अधिक श्रेयस्कर, वरच्या दर्जाचा

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • It is death before dishonour for any person having self-respect.
  • कोणत्याही स्वाभिमानी व्यक्तीसाठी अपमानापेक्षा मृत्यू हा अधिक श्रेयस्कर आहे.
Example 2
  • A lieutenant general comes before a colonel in the Indian Army.
  • भारतीय सैन्यात लेफ्टनंट जनरल हा कर्नलपेक्षा वरच्या दर्जाचा (वरच्या अधिकाराचा) असतो.

This article has been first posted on and last updated on by