How to use "behind" - Compound Preposition


मागे, पाठीमागे, आड, कारणीभूत


behind (बिहाइंड) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे केला जातो.

behind हे जेव्हा वाक्यामध्ये Compound Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

मागे, आड (एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांच्या आड, मागील बाजूस)

For example (उदाहरणार्थ):
  • The moon is behind a cloud.
  • चंद्र एका ढगाआड (ढगाच्या पाठीमागे) आहे.
  • His school is behind the post office.
  • त्याची शाळा पोस्टाच्या पाठीमागे आहे.
अर्थ २

मागे, पाठीमागे (एखाद्याच्या मागे त्याच्या समर्थनासाठी किंवा मदतीसाठी)

For example (उदाहरणार्थ):
  • The whole country was behind him.
  • संपूर्ण देश त्याच्या पाठीमागे होता
  • Dont worry, I am behind you.
  • काळजी करू नका, मी तुमच्या मागे आहे.
अर्थ ३

मागे (एखाद्या परिस्थितीला कारणीभूत)

For example (उदाहरणार्थ):
  • Those people were behind his killing.
  • ते लोक त्याच्या हत्येच्या मागे (हत्येस कारणीभूत) होते.
  • So many vehicles on the streets are behind the rising levels of pollution.
  • रस्त्यांवरील खूप सारी वाहने प्रदूषणाच्या वाढत्या पातळीला कारणीभूत आहेत.

This article has been posted on and last updated on by