How to use "below" - Compound Preposition


खाली


below (बिलो) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे केला जातो.

below हे जेव्हा वाक्यामध्ये Compound Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ

खाली (जागा, दर्जा, परिमाण, किंमत, गुण इत्यादींच्या बाबतीत)

For example (उदाहरणार्थ):
  • Night occurs when the sun reaches eighteen degrees below the horizon.
  • क्षितिजाच्या खाली सूर्य जेव्हा अठरा अंशांपर्यंत खाली पोहोचतो तेव्हा रात्र होते.
  • Rainfall is below average this year.
  • यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी (सरासरीच्या खाली) आहे.
  • His new office is two floors below his old office.
  • त्याचे नवीन कार्यालय त्याच्या जुन्या कार्यालयाच्या दोन मजले खाली आहे.

This article has been posted on and last updated on by