How to use "beside" - Compound Preposition


शेजारी, जवळ, बाजूला, तुलना केल्यास


beside (बिसाइड) हे एक Compound Preposition असून इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

जवळ, बाजूला, शेजारी

For example (उदाहरणार्थ):
  • He sat down beside his wife.
  • तो त्याच्या बायकोशेजारी (बायकोजवळ) जाऊनबसला.
  • I always keep a book beside my bed.
  • मी नेहमी माझ्या पलंगाशेजारी (पलंगाच्या बाजूला) एखादं पुस्तक ठेवतो.
अर्थ २

जोडीला (तुलना केल्यास)

For example (उदाहरणार्थ):
  • My painting looks poor beside yours.
  • तुझ्या चित्राच्या जोडीला (चित्राशी तुलना केल्यास) माझे चित्र इतके चांगले दिसत नाही.

beside (बिसाइड) आणि besides (बिसाइड्स) हे दोन वेगवेगळे शब्द असून त्यांचा वाक्यातील अर्थ पूर्णपणे भिन्न आहे.

या दोन्ही शब्दांमध्ये फक्त एका s या अक्षराचा फरक आहे हे लक्षात घ्यावे.

This article has been posted on and last updated on by