How to use "between" - Compound Preposition


मध्ये ("दोहोंमध्ये" या अर्थाने)


between (बिट्विन्) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Adverb किंवा Preposition म्हणून केला जातो.

between हे जेव्हा वाक्यामध्ये Compound Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ

मध्ये ("दोहोंमध्ये" या अर्थाने)

For example (उदाहरणार्थ):
  • The bond between brother and sister is very strong.
  • भाऊ आणि बहिण यांच्यामधील बंधन हे खूप भक्कम असते.
  • The money will be divided between you and me.
  • ते पैसे तुझ्या माझ्यात (आपल्या दोघांमध्ये) विभागले जातील.

दोनपेक्षा अधिक वस्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये असा उल्लेख करावयाचा असल्यास among/amongst वापरावे.

मात्र, फक्त दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती यांच्यामध्ये असा उल्लेख करावयाचा असल्यास नेहमी between चा उपयोग करावा.

This article has been posted on and last updated on by