How to use "beyond" - Compound Preposition


च्या पलीकडे, आवाक्याबाहेर


beyond (बियाँड) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Adverb किंवा Preposition म्हणून केला जातो.

beyond हे जेव्हा वाक्यामध्ये Compound Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

च्या पलिकडे (च्या पुढे)

For example (उदाहरणार्थ):
  • His house is beyond this hill.
  • त्याचे घर या टेकडीच्या पलिकडे आहे.
  • We could see the hills beyond the valley.
  • दरीपलिकडच्या टेकड्या आम्हाला दिसत होत्या.
अर्थ २

आवाक्याबाहेर (क्षमतेच्या पलिकडे)

For example (उदाहरणार्थ):
  • Higher education for his children was beyond his income.
  • त्याच्या मुलांसाठीचं उच्चशिक्षण त्याच्या मिळकतीच्या आवाक्याबाहेरचं आहे.
  • It was beyond her ability to work for more than eight hours a day.
  • दिवसभरात आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम करणे हे तिच्या आवाक्याबाहेरचे होते.

This article has been posted on and last updated on by