How to use "outside" - Compound Preposition


..च्या बाहेर, बाहेरील बाजूस


outside (आऊटसाइड) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Noun, Adjective, Adverb किंवा Preposition म्हणून केला जातो.

outside हे जेव्हा वाक्यामध्ये Compound Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ

..च्या बाहेर (बाहेरील बाजूस)

For example (उदाहरणार्थ):
  • He has parked his car outside the house.
  • त्याने आपली गाडी घराबाहेर (घराच्या बाहेरील बाजूस) लावली आहे.
  • They were waiting for him outside the door.
  • ते दरवाजाच्या बाहेर (दरवाजाच्या बाहेरील बाजूस) त्याची वाट पाहत होते.

outside चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये inside या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द म्हणजेच Antonym (ऍन्टोनिम) म्हणूनदेखील करता येतो.

This article has been posted on and last updated on by