How to use "toward" / "towards" - Compound Preposition


कडे, ..च्या दिशेने, संबंधी, ..च्या हेतूने, जवळ


towards (टोवर्ड्स) किंवा toward (टोवर्ड) हे एक Compound Preposition असून इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

towards आणि toward या दोन शब्दांमध्ये फक्त एका S या अक्षराचा फरक आहे.

मात्र, या दोन्हीही शब्दांचा अर्थ सारखाच आहे हे लक्षात ठेवावे.

अर्थ १

कडे (..च्या दिशेने)

For example (उदाहरणार्थ):
 • The train was coming towards the station.
 • गाडी स्थानकाकडे (स्थानकाच्या दिशेने) येत होती.
 • He turned toward the door.
 • तो दरवाज्याकडे (दरवाजाच्या दिशेने) वळला.
अर्थ २

एखाद्या विषयासंबंधी (as regards)

For example (उदाहरणार्थ):
 • What is Government's attitude towards free education?
 • मोफत शिक्षणासंबंधी सरकारचा दृष्टीकोन काय आहे?
 • My feelings have changed toward her.
 • तिच्यासंबंधीच्या माझ्या भावना आता बदलल्या आहेत.
अर्थ ३

..च्या हेतूने (..च्या दृष्टीने)

For example (उदाहरणार्थ):
 • I have started saving money towards my higher education.
 • माझ्या उच्च शिक्षणासाठी (उच्च शिक्षणाच्या हेतूने) मी पैसे साठवायला सुरूवात केली आहे.
 • Government is working toward eradicating discrimination.
 • भेदभाव निर्मूलनाच्या दृष्टीने सरकार काम करत आहे.
अर्थ ४

जवळ, आसपास (जरा अगोदर)

For example (उदाहरणार्थ):
 • He reached home towards midnight.
 • तो मध्यरात्रीच्या आसपास (मध्यरात्रीच्या जरा अगोदर) घरी पोचला.
 • Account audit is scheduled toward the end of the year.
 • खात्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी वर्षाखेरीस (वर्ष संपण्याचा जरा अगोदर) नियोजित केलेली आहे.

This article has been posted on and last updated on by