How to use "by" - Simple Preposition


जवळ/शेजारी, शेजारून/वरून (गतिवाचक), वेळी (कालावधी), ..ने (वाहनाने)


by (बाय्) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Preposition किंवा Adverb अशा दोन्हीही प्रकारे करता येतो.

जेव्हा by ला जोडून त्यानंतर एखादे Noun किंवा Pronoun वापरलेले असते, तेव्हा त्याला Preposition समजले जाते.

मात्र, जेव्हा by हे एखाद्या To च्या Verb ला जोडून वापरलेले असते आणि त्याला कोणतेही Noun किंवा Pronoun जोडलेले नसते, तेव्हा त्याचा उपयोग वाक्यामध्ये Adverb म्हणून केलेला असतो.

by हे जेव्हा वाक्यामध्ये Simple Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

जवळ, शेजारी, पाशी

For example (उदाहरणार्थ):
  • He was sitting by the beach.
  • तो समुद्रकिनाऱ्याजवळ बसला होता.
  • They were standing by the door.
  • ते दाराजवळ (दाराशेजारी) उभे होते.
अर्थ २

शेजारून, वरून (गतिवाचक)

For example (उदाहरणार्थ):
  • I go by the post office every day.
  • मी दररोज पोस्ट ऑफिसवरून जातो.
  • He ran by us in the morning.
  • तो सकाळी आमच्या शेजारून धावत गेला.
अर्थ ३

वेळी, दरम्यान, मध्ये, पर्यंत, पूर्वी (कालावधी)

For example (उदाहरणार्थ):
  • He will reach there by night.
  • तो रात्री (रात्रीच्या वेळी) तेथे पोहोचेल.
  • Farmers return home by evening.
  • शेतकरी संध्याकाळपर्यंत घरी परत येतात.
अर्थ ४

..ने (वाहनाने)

For example (उदाहरणार्थ):
  • He came by car.
  • तो गाडीने आला.
  • She was travelling by plane.
  • ती विमानाने प्रवास करत होती.

वाहनाने या अर्थी जेव्हा by चा उपयोग वाक्यामध्ये केलेला असतो, तेव्हा by आणि त्यानंतर वापरलेले Noun यांच्यामध्ये कधीही कोणतेही Article (उपपद) म्हणजेच a / an / the किंवा कोणतेही Possessive Adjective वापरले जात नाही.

This article has been posted on and last updated on by