How to use "in" - Simple Preposition


आत, मध्ये, ..चा भाग(अंश), अवधीच्या आत(वेळ), एखाद्या परिस्थितीत


in (इन्) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Preposition किंवा Adverb अशा दोन्हीही प्रकारे करता येतो.

जेव्हा in ला जोडून त्यानंतर एखादे Noun किंवा Pronoun वापरलेले असते, तेव्हा त्याला Preposition समजले जाते.

मात्र, जेव्हा in ला कोणतेही Noun किंवा Pronoun जोडलेले नसते, तेव्हा त्याचा उपयोग वाक्यामध्ये Adverb म्हणून केलेला असतो.

in हे जेव्हा वाक्यामध्ये Simple Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

आत, मध्ये

For example (उदाहरणार्थ):
 • He is now in Mumbai.
 • तो आता मुंबईमध्ये आहे.
 • She put the pen in the box.
 • तिने लेखणी पेटीत (पेटीच्या आत) ठेवली.
अर्थ २

..चा भाग (अंश, हिस्सा दर्शविताना)

For example (उदाहरणार्थ):
 • There are seven days in a week.
 • एका आठवड्यात सात दिवस असतात.
 • There are twelve months in a year.
 • एका वर्षात बारा महिने असतात.
अर्थ ३

अवधीच्या आत (वेळ)

For example (उदाहरणार्थ):
 • Rome was not built in a day.
 • रोम एका दिवसात बांधला गेला नाही.
 • He will visit us in summer.
 • तो आम्हाला उन्हाळ्यामध्ये (उन्हाळा संपण्याच्या आत) भेट देईल.
अर्थ ४

एखाद्या परिस्थितीत

For example (उदाहरणार्थ):
 • I can't work in this heat.
 • मी या उष्णतेत (उष्ण परिस्थितीत) काम करू शकत नाही.
 • He was walking in the rain.
 • तो पावसामध्ये चालत होता.

This article has been posted on and last updated on by