How to use "of" - Simple Preposition


..चा (Possession - मालकी दर्शक)


of (ऑफ्) हे एक Simple Preposition असून इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

..चा, ..ची, ..चे, ..च्या (एखाद्या गोष्टीचा - मालकीदर्शक)

For example (उदाहरणार्थ):
 • The walls of his house are white.
 • त्याच्या घराच्या भिंती पांढऱ्या (पांढऱ्या रंगाच्या) आहेत.
 • The collection of short stories is very nice.
 • तो लघुकथांचा संग्रह खूप चांगला आहे.
अर्थ २

..चा (संबंधीचा)

For example (उदाहरणार्थ):
 • This novel is a story of love and romance.
 • ही कादंबरी एक प्रेमासंबंधीची रम्यकथा आहे.
 • I like to watch news of war.
 • मला युद्धासंबंधीच्या बातम्या बघायला आवडतात.
अर्थ ३

..चा (च्या बाजूला)

For example (उदाहरणार्थ):
 • Goa is located to the south of Maharashtra.
 • गोवा महाराष्ट्राच्या दक्षिणेच्या बाजूला आहे.
 • January comes at the beginning of year.
 • जानेवारी महिना वर्षाच्या सुरूवातीला येतो.
अर्थ ४

..चा (च्या नावाचा)

For example (उदाहरणार्थ):
 • India is situated in the Continent of Asia.
 • भारत देश आशिया (आशिया नावाच्या) खंडात वसलेला आहे.
 • The City of Mumbai has better transportation than most other Indian cities.
 • इतर भारतीय शहरांपेक्षा मुंबई शहरात (मुंबई नावाच्या शहरात) दळणवळणाच्या चांगल्या सुविधा आहेत.
अर्थ ५

..चा (पैकी भाग)

For example (उदाहरणार्थ):
 • She drank the whole of milk in the pot.
 • पातेल्यामधील दूध तिने संपूर्ण प्यायलं.
 • He has inherited a half of a million dollars.
 • त्याला अर्धा दशलक्ष (दशलक्षाचा अर्धा भाग) डॉलर वारसाहक्काने मिळाले आहेत.

This article has been posted on and last updated on by