How to use "off" - Simple Preposition


पासून दूर, पासून अलग, बाजूला


off (ऑफ) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Adjective किंवा Preposition किंवा Adverb अशा तीनही प्रकारे करता येतो.

off हे जेव्हा वाक्यामध्ये Simple Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

पासून दूर, पासून अलग

For example (उदाहरणार्थ):
  • The second hand fell off the clock.
  • सेकंदाचा काटा घड्याळापासून अलग होऊन पडला.
  • A tyre has come off the car.
  • गाडीचे एक चाक गाडीपासून अलग झालेले आहे.
अर्थ २

बाजूला (जरा थोड्या अंतरावर)

For example (उदाहरणार्थ):
  • My school is off the lake.
  • माझी शाळा तलावापासून थोड्या अंतरावर आहे.
  • Andaman and Nicobar islands are off the south-east coast of India.
  • अंदमान आणि निकोबार बेटे भारताच्या आग्नेय किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर आहेत.

This article has been posted on and last updated on by