How to use "on" - Simple Preposition


वर, दिवशी, नंतर, विषयी, बाजूला, साधनाने


on (ऑन्) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Preposition किंवा Adverb अशा दोन्हीही प्रकारे करता येतो.

जेव्हा on ला जोडून त्यानंतर एखादे Noun किंवा Pronoun वापरलेले असते, तेव्हा त्याला Preposition समजले जाते.

मात्र, जेव्हा on ला कोणतेही Noun किंवा Pronoun जोडलेले नसते, तेव्हा त्याचा उपयोग वाक्यामध्ये Adverb म्हणून केलेला असतो.

on हे जेव्हा वाक्यामध्ये Simple Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

वर (कोणत्याही पृष्ठभागावर)

For example (उदाहरणार्थ):
  • He kept the book on the table.
  • त्याने पुस्तक टेबलावर ठेवले.
  • You can hang your coat on the wall.
  • तुम्ही तुमचा अंगरखा भिंतीवर अडकवू शकता.
अर्थ २

वर (शरीराच्या कोणत्याही भागावर)

For example (उदाहरणार्थ):
  • He was wearing a hat on his head.
  • तो त्याच्या डोक्यावर टोपी घालत होता.
  • He had a coat on his back.
  • त्याच्या पाठीवर अंगरखा होता.
अर्थ ३

दिवशी (कालवाचक)

For example (उदाहरणार्थ):
  • He gets his salary on the first day of the month.
  • महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याला त्याचा पगार मिळतो.
  • We have a holiday on Sunday.
  • रविवारी (रविवारच्या दिवशी) आम्हाला सुट्टी आहे.
अर्थ ४

नंतर (एखाद्या गोष्टीच्या नंतर)

For example (उदाहरणार्थ):
  • I will take a bath on reaching home.
  • मी घरी पोहोचल्यावर (पोहोचल्यानंतर) स्नान करेन.
  • She will be very happy on seeing him.
  • त्याला बघून (बघितल्यानंतर) तिला खूप आनंद होईल.
अर्थ ५

विषयी (एखाद्या विषयावर)

For example (उदाहरणार्थ):
  • His lecture on phonetics was very good.
  • त्याचे ध्वनिशास्त्रावरचे (ध्वनिशास्त्र या विषयावरचे) व्याख्यान फार चांगले होते.
  • It is a useful book on botany.
  • वनस्पतिशास्त्रावरचे (वनस्पतिशास्त्र या विषयावरचे) हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
अर्थ ६

बाजूला (स्थलवाचक)

For example (उदाहरणार्थ):
  • He was driving the car on the wrong side.
  • तो चुकीच्या बाजूला गाडी चालवत होता.
  • Many people pray on the Ganges.
  • बरेच लोक गंगेवर (गंगा नदीच्या बाजूला) प्रार्थना करतात.
अर्थ ७

साधनाने, इंधनाने, ..च्या जोरावर

For example (उदाहरणार्थ):
  • My car runs on petrol.
  • माझी गाडी पेट्रोलवर (पेट्रोल या इंधनाने) चालते.
  • I can work longer on a cup of tea.
  • मी एक कप चहावर (एक कप चहाच्या जोरावर) जास्त वेळ काम करू शकतो.

This article has been posted on and last updated on by