How to use "to" - Simple Preposition


कडे, पर्यंत, अप्रत्यक्ष कर्म दर्शविण्यासाठी


to (टू) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Preposition किंवा Adverb अशा दोन्हीही प्रकारे करता येतो.

तसेच, त्याचा उपयोग वाक्यातील Infinitive दर्शविण्यासाठी देखील केला जातो.

जेव्हा to ला जोडून त्यानंतर एखादे Noun किंवा Pronoun वापरलेले असते, तेव्हा त्याला Preposition समजले जाते.

मात्र, जेव्हा to ला कोणतेही Noun किंवा Pronoun जोडलेले नसते, तेव्हा त्याचा उपयोग वाक्यामध्ये Adverb म्हणून केलेला असतो.

त्याचप्रमाणे, जेव्हा to ला जोडून त्यानंतर एखादे To चे Verb वापरलेले असते, तेव्हा to आणि To चे Verb या संपूर्ण शब्दसमूहाला Infinitive समजले जाते.

to हे जेव्हा वाक्यामध्ये Simple Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

कडे (..च्या रोखाने)

For example (उदाहरणार्थ):
 • He was going to the post office.
 • तो टपाल कार्यालयाकडे जात होता.
 • There is an ice cream shop on the way to school.
 • शाळेकडे जाण्याच्या मार्गावर एक आईसक्रिमचे दुकान आहे.
अर्थ २

पर्यंत (शेवटपर्यंत, अखेरपर्यंत)

For example (उदाहरणार्थ):
 • I will be with you to the very end.
 • मी अगदी शेवटपर्यंत तुझ्यासोबत असेन.
 • The army fought to the last drop of blood.
 • सैन्य रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत (अखेरच्या श्वासापर्यंत) लढले.
अर्थ ३

अप्रत्यक्ष कर्म दर्शविण्यासाठी (Indirect Object)

For example (उदाहरणार्थ):
 • He sent a letter to his sister.
 • त्याने त्याच्या बहिणीला पत्र पाठवले.
 • They showed the book to the teacher.
 • त्यांनी शिक्षकांना ते पुस्तक दाखवले.

यामध्ये वाक्यातील रचना पुढीलप्रमाणे केलेली असते.

To चे Verb + Direct Object (प्रत्यक्ष कर्म) + to + Indirect Object (अप्रत्यक्ष कर्म)

This article has been posted on and last updated on by